आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिलानींनी नाकारली शिष्टमंडळाची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- अशांत काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी दाखल झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात येणार नाही, असे फुटीरवादी नेते सईद अली शहा गिलानी यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सर्व गटांशी विनाशर्त चर्चेची तयारी दर्शवली आहे.

राज्यातील सर्व राजकीय, वैचारिक गटांशी आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. परंतु त्यासाठी कोणतीही शर्त असता कामा नये. जेणेकरून राज्यात पुन्हा शांतता स्थैर्य स्थापन होऊ शकेल, असे मुफ्ती म्हणाल्या. फेसबुक पोस्ट करून त्यांनी सरकारची भूमिका मांडली आहे. सर्वांशी चर्चा केल्यानंतर त्यातून सहमती तयार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जम्मू काश्मीर पँथर्स पार्टीने (जेकेएनपीपी) सर्व पक्षीय नेत्यांसोबत चर्चा करण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर चर्चेवर बहिष्कार घातला. पक्षाच्या प्रमुख हर्ष देव सिंह यांनी प्रेस क्लबजवळ निदर्शने केली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांचे नेते काश्मिरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचा हा दोन दिवसांचा दौरा आहे. आम्ही सर्व गटांशी चर्चा करून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेऊ, असे राज्यसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

खासदार दारावरून परतले
गेल्या ६० दिवसांपासून सईद अली शहा गिलानी यांना त्यांच्याच घरात अटक करण्यात आली आहे. त्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळातील चार खासदार गेले होते. परंतु आपण भेटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट बजावले. घराजवळ आलेल्या खासदारांसाठी साधे दार उघडून बोलावण्याचेही सौजन्य गिलानी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवले नाही. माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी, भाकपचे डी. राजा, राजदचे जय प्रकाश नारायण, जदयूचे शरद यादव यांना अखेर दारावरून रिकाम्या हाताने परतावे लागले.

हुरियत नेत्यांशी चर्चा
एमआयएमचे नेते असदुद्दीन आेवैसी यांनी मात्र हुरियत नेते मिवैझ उमर फारूक यांच्याशी चाष्माशाही तुरुंगात स्वतंत्रपणे भेट घेतली. दोघांत काही वेळ चर्चा झाली. फारूकला तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...