आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TA, DA Fake Bill, Commander Get 5 Years Punishment

टीए, डीएची खोटी बिले, कमांडरला ५ वर्षे शिक्षा - सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा फैसला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडमधील निवृत्त विंग कमांडरला नोकरीच्या काळातील खोट्या प्रवास व जेवण भत्त्याच्या बिलावरून सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. के. एस. तिवारी असे या कमांडरचे नाव असून त्याने हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये उपमुख्य कम्युनिकेशन पायलट म्हणून काम केले होते. याशिवाय त्याला ४ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेने २००३ मध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. १९९७ ते २००३ दरम्यानच्या सेवेत तिवारी एचएएलच्या वाहतूक विभागाच्या मुख्य निरीक्षकासोबत गुन्हेगारी कटात सहभागी होता. टीए, डीएच्या खोट्या बिलातून फसवणूक
केल्याने कंपनीचे नुकसान झाले. याप्रकरणी २००४ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण प्रलंबित होते.