आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tanker Dashing At Jharkhand, 12 Killed, Giridih News In Marathi

झारखंड: सरस्वती विसर्जन मिरवणुकीत घुसला भरधाव टॅंकर, 12 जणांना चिरडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/गिरिडीह- झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात सरस्वती विसर्जण मिरवणुकीत भरधाव टॅंकरने 12 जणांना चिरडल्याची घटना घडली. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 20 जण जखमी आहे. बगोदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर जीटी रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.

कशी झाली दुर्घटना?
- NH-2 जवळील गेडा भागात रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. एका शाळेद्वारा सरस्वती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती.
- दरम्यान, भरधाव वेगात आलेला टँकर मिरवणुकीत घुसला.
- आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर चार जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
- दुर्घटनेत 20 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
- दुर्घटनेनंतर टँकरचा चालक व सहचालक पसार झाले.
- टँकर धनबादकडून गयाकडे जात होता.
- दुर्घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. रास्ता रोको करण्‍यात आली. घटनास्थळी पोलिस उशीरा पोहोचल्याने त्यांच्यावर जमावाने दगडफेकही केली. अॅम्बुलन्सचीही तोडफोड केली.
-तणाव वाढल्याने पोलिस व सीआरपीएफची अतिरिक्त कुमक बोलवण्यात आली.
- व्यापार्‍यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बंद पुकारला आहे.

मृतांच्या वारसांना एक-एक लाख रुपये मदत- मुख्यमंत्री
प्रत्येक मृतांच्या वारसांना एक-एक लाख रुपये मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मृतांचे नातेवाईकांनी पाच लाख रुपये व सरकारी नोकरीची मागणी केली होती.

पुढील स्लाइडवर पाहा दुर्घटनेचे फोटोज...