आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजमहालाच्या सौंदर्याला पर्यटक मुकणार, मुख्य घुमटावर देणार मातिचा मुलामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा (उत्तर प्रदेश)- जगभरातील पर्यटकांना आपल्या सौंदर्याची भुरळ घालणाऱ्या ताजमहलाच्या मुख्य घुमटाला मातिचा मुलामा देण्याचा निर्णय पुरातत्त्व खात्याने घेतला आहे. त्यासाठी घुमटाभोवती स्टिलचे स्ट्रक्चरही तयार केले जाणार आहे. सुमारे वर्षभर हा मुलामा कायम ठेवला जाणार आहे. सुमारे 2 मिमीचा हा मुलामा असेल. त्यामुळे पर्यटकांना संबंध ताज बघण्याची आणि त्याच्यासमोर उभे राहून फोटो काढण्याची संधी मिळणार नाही.
पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांपासून तयार करण्यात आलेल्या ताजमहालाला गेल्या काही वर्षांपासून पिवळेपणाची एक लेअर आली आहे. त्याची चर्चा देश-विदेशात रंगली आहे. प्रदुषण, जुनी वास्तू आणि इतर कारणांमुळे ही लेअर आल्याचे सांगितले जाते. पण ती दूर करायची असेल तर नॅचरल थेरपी करण्याची गरज असल्याचे पुरातत्त्व खात्याने सांगितले आहे. त्यामुळे मड थेरपीचा निर्णय घेण्यात आला आहे.
पण मातीचा मुलामा दिल्यानंतर लगेच त्याचे परिणाम दिसणार नाहीत. सुमारे वर्षभर हा मुलामा ताजच्या मुख्यघुमटावर ठेवावा लागणार आहे. हा थर सुकल्यानंतर नॉयलॉनच्या ब्रशने काढला जाईल. अत्यंत स्वच्छ पाण्याने ही वास्तू धुतली जाईल. त्यानंतर पर्यटकांना पांढऱ्या शुभ्र ताजमहालाचे दर्शन करता येईल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, ताज महालाची वैशिष्ट्ये.... येथील मेहमानखाना होता इंग्रजांचा हनिमुन स्पॉट.... अशी भांडी की विष कालवले तर भांड्यांच्या रंग बदलायचा.... नकली आहे ताजमहलातील कबर...
बातम्या आणखी आहेत...