आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Take Action On The Drone Officers Issue At Uttar Pradesh, Divya Marathi

आळशी अधिकार्‍यांवर कारवाई : अखिलेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांवर अलीकडे केलेल्या कारवाईचे गुरुवारी सर्मथन केले. कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे सत्र सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. चौधरी चरणसिंह यांच्या 27 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर यादव बोलत होते. उत्तर प्रदेश सरकारने अलीकडेच काही आयएएस आणि आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या, तर फिरोजाबाद आणि लाखीपूर येथील एसपींना निलंबित केले आहे