आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यावरून फेसबुकवर दिला घटस्फोट; विवाहितेची कोर्टात धाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदायू- उत्तर प्रदेशातील बदायूजवळील दातागंज गावात हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यावरून पत्नीला फेसबुकवरून  तलाक देण्याची घटना घडली. मोहंमद हुसेन यांची मुलगी मेहनाज बेगम हिचा विवाह दीड वर्षापूर्वी दिल्लीतील व्यापारी वसीम अहमद याच्याशी झाला होता. मेहनाजने सांगितले : वडिलांनी जमीन विकून लग्नात सुमारे २० लाख रुपये खर्च केले तरीही तो सासऱ्याकडे स्कॉर्पिओची मागणी करत होता.  
 
१६ मे २०१६ रोजी वसीम आणि तिच्या नातेवाइकांनी तिला विष देऊन मारण्याचाही प्रयत्न केला होता, असा आरोप तिने केला आहे. त्यानंतर १७ मे रोजी ती दातागंजला माहेरी परतली. २६ नोव्हेंबर रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. २४ ऑक्टोबर रोजी पती वसीमने फेसबुकवरून तीन वेळा तलाक लिहून संदेश पोस्ट केला होता.
बातम्या आणखी आहेत...