आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई - श्रीलंकेतील तामिळींच्या मुद्द्यावर तामिळनाडू विधानसभेने यूपीए सरकारवर आणखी दबाव वाढवला आहे. सरकारने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये तामिळींच्या स्वतंत्र राज्यासाठी सार्वमत घेण्याची मागणी करणारा प्रस्ताव आणावा. तसेच श्रीलंकेला यापुढे मित्रदेश संबोधू नये, असा ठरावही तामिळनाडू विधानसभेत बुधवारी करण्यात आला.
श्रीलंकेत तामिळींविरुद्धचे दमनचक्र थांबेपर्यंत तसेच नरसंहार व युद्धातील गुन्हेगारांची आंतरराष्ट्रीय चौकशी होईपर्यंत त्या देशासोबतचे आर्थिक संबंध संपुष्टात आणावेत, अशी मागणी करणारा प्रस्ताव विधानसभेने एकमताने मंजूर केला. मुख्यमंत्री जयललिता यांनी प्रस्ताव मांडला. त्यावर विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन चिंताजनक असून त्यांना ते मागे घेण्याचे सांगितले आहे.
श्रीलंकेशी मैत्री नकोच
सांगितले आहे, असे त्या म्हणाल्या. 2009 मध्ये श्रीलंकेत युद्धबंदी लागू करण्यात अपयश आल्याबद्दल जयललिता यांनी केंद्र व द्रमुकला दोषी ठरवले. द्रमुक प्रमुख करुणानिधी यांची या मुद्दय़ावर दुटप्पी भूमिका होती, राज्यातील जनतेलाही याची जाणीव आहे. जयललिता बोलत असताना द्रमुक आमदारांनी गोंधळ केला. विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांनी त्यांना बाहेर काढण्याचा आदेश दिला. जयललिता म्हणाल्या, करुणानिधी यांनी सत्ताकाळात तामिळींसाठी काहीही केले नाही. आता सरकारमधून बाहेर पडत तामिळींसाठी बलिदान दिल्याचा आव ते आणत आहेत. टी. आर. बालू अद्याप रेल्वे समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे पुत्र अझागिरी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. यावर करुणानिधींचे मौन का आहे, असा सवाल जयललिता यांनी केला.
सनच्या टीममध्ये लंकेचे खेळाडू
आयपीएलमधील आपल्या कुटुंबीयांच्या संघातील लंकेच्या खेळाडूंबाबत करुणानिधी गप्प का आहेत, असा सवाल जयललिता यांनी केला. करुणानिधींचे नातलग कलानिधी मारन यांच्या सन समूहाची मालकी असलेल्या सनरायझर्स टीमचा कर्णधारच कुमार संगकारा आहे. याशिवाय तिषारा परेरादेखील संघात आहे, असे जयांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.