आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयललिता या 10 कारणांमुळे बनल्या सर्व सामान्यांच्या \'अम्मा\'; अल्पदरात उपलब्ध करून दिले सबकुछ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या सुप्रीमो जयललिता यांचे सोमवारी रात्री निधन झाले. मागील 74 दिवसांपासून त्यांचा जीवनाशी संघर्ष सुरु होता. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये 22 सप्टेंबरपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, रविवारी सायंकाळी हृदयक्रिया बंद (कार्डियाक अ‍ॅरेस्ट) पडली आणि त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती.

तामिळनाडूची जनता झाली पोरकी...
जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूची जनता पोरकी झाली आहे. त्यांनी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. सगळे त्यांना परमेश्वर समजत. राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या हिताचे त्यांंनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. जनतेवर त्यांच्यावर इतके प्रेम होते की, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी त्यांना अटक झाली तेव्हा त्यांच्या शेकडो समर्थकांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

जयललिता जनतेसाठी होत्या परमेश्वर...
- जयललिता तामिळनाडूत 'अम्मा' या नावाने लोकप्रिय होत्या. जनतेसाठी जणूू त्या परमेश्वरच होत्या.
- जयललिता यांना राज्यातील सर्व सामान्य जनतेसाठी अल्प दरात 'अम्मा' नावाने अनेक योजना आणल्या होत्या. या योजना संपूर्ण देशात लोकप्रिय ठरल्या आहेत.
- जयललितांनी राज्यातील जनतेसाठी मीठापासून सिनेमापर्यंत सर्व गोष्टी अल्पदरात उपलब्ध करून दिल्या होत्या.
- राज्यातील गरीब जनतेलाही सर्व गोष्‍टी मिळायला हव्या. तो त्यांचा अधिकार आहे, अशी त्यांची भूमिका होती.
- जयललिता यांचे राज्यातील जनतेशी एक भावनिक नाते निर्माण झाले होते.

जयललितांचा थक्क करणारा जीवनप्रवास....
> 24 फेब्रुवारी 1948 रोजी जयललितांचा जन्म झाला. करिअरची सुरुवात सिनेमा क्षेत्रातून केली. तामिळ, तेलुगू आणि कन्नड या तीन भाषेतील 140 चित्रपटांमध्ये जयललितांनी काम केलं आहे.
> 1960 ते 1980 या कालावधीत त्या सिनेमा क्षेत्रात सक्रीय होत्या.
> एम. जी. रामचंद्रन यांच्या प्रेरणेतून 1982 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
> 1983 मध्ये पोटनिवडणुकीतून पहिल्यांदाच आमदार झाल्या.
> त्यानंतर 1984 मध्ये राज्यसभेवर निवडून गेल्या.
> रामचंद्रन यांच्या निधनानंतर जयललितांनी ‘एआयएडीएमके’ पक्षाची सूत्रं स्वीकारली.
> 1989 मध्ये विरोधी पक्ष नेतेपद भूषवलं आणि तामिळनाडूच्या पहिल्या महिला विरोधी पक्ष नेत्या होण्याचा बहुमान मिळाला.
> 24 जून 1991 रोजी तामिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
> 1996 च्या निवडणुकीत जयललितांचा मोठा पराभव झाला. भ्रष्टाचार, विकास कामांच्या अभावामुळे जनतेनं जयललितांना नाकारलं.
> 2001 मध्ये भ्रष्टाचार प्रकरणी जयललितांना 30 दिवसांचा तुरुंगवास झाला.
> जयललिता 2001 मध्ये दुसऱ्यांदा तामिळनाडुच्या मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्या.
> 2011 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.
> 2014 मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड ठोठावण्यात आला.
> 2015 मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर जयललिता 2015 मध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या.
> 5 डिसेंबरबर 2016 रोजी दीर्घ आजाराने चेन्नईतील अपोलो रुग्णालयात मृत्यू झाला.

पुढील स्लाइड्सवर याचा, या 10 कारणांमुळे जयललिता बनल्या सर्व सामान्यांच्या अम्मा...
बातम्या आणखी आहेत...