आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडू: चेन्नई पाण्यात, महापूराने हजारो घरांना वेढले, पाहा भयान स्थितीचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नईत मागील आठ दिवसापासून पावसाचा कहर सुरू असून तेथे अशी स्थिती झाली आहे. - Divya Marathi
चेन्नईत मागील आठ दिवसापासून पावसाचा कहर सुरू असून तेथे अशी स्थिती झाली आहे.
चेन्नई- तामिळनाडूतील चेन्नईसह सुमद्रकिनारी भागात सलग 8 व्या दिवशी पावसाचा कहर सुरूच आहे. चेन्नईतस मागील 24 तासात 202 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस 1 डिसेंबर 2015 च्या महापूराच्या नंतर एका दिवसात पडलेला सर्वात जास्त आहे. कांचीपूरमध्ये सर्वाधिक 627 मिमी पाऊस पडला आहे. राज्यात शुक्रवारी 193 मिली पावसाची नोंद झाली. समुद्रकिनारी जिल्ह्यात पूराची स्थिती आहे. स्कूल-कॉलेज आणि यूनिवर्सिटीला सुट्टी देण्यात आली आहे. तर काही विभागाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सरकारने चेन्नईत 12 हजार आयटी आणि अन्य कंपन्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. रेल्वे बंद...
 
- राज्य सरकारच्या माहितीनुसार, या पावसामुळे 600 कोटींहून अधिक प्रोजेक्टचे काम बाधित झाले आहे. चेन्नईतील सेंट थॉमस माउंट आणि कोदम्बकम दरम्यानची गुरुवारी रात्रीपासून रेल्वे बंद आहेत.
- सरकारने प्रत्येक जिल्ह्यात रेस्क्यू ऑपरेशनसाठी 1 मंत्री आणि 3 अधिका-यांची टीम बनविली आहे. चेन्नईची जबाबदारी दोन मंत्र्यांवर सोपवली आहे.
-  हवामान खात्याने 6 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
 
#राज्यात महापूराची स्थिती- 
 
- तारांगामबाडी आणि सिरकाजी तालुक्यातील 1 हजार घरे महापूरात बुडाली आहेत.
- नागापटि्टनममध्ये शेकडो घरे पाण्या बुडाली आहेत. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिके पाण्यात लोळत आहेत.
- सुमद्रकिनारी जिल्ह्यातील सुमारे 70% भागात वीज गायब झाली आहे.
- या पावसाचा सर्वात जास्त फटका दक्षिण चेन्नईला बसला आहे. येथील घरात कमरेपर्यंत पाणी पोहचले आहे.
- राज्यातील समुद्रकिनारी जिल्ह्यात 5 दिवसात 80% कामकाज प्रभावित झाले आहे.  
- 50% लोकांजवळ पिण्याचे पाणी नाही.
 
#चेन्नईत 5 वर्षातील सर्वाधिक पाऊस-
 
- चेन्नईत शुक्रवारी 202 मिमी पाऊस झाला. मागील तीन दिवसात तेथे 554 मिमी पाऊस पडला आहे. हा ऑक्टोबरमध्ये होणा-या पावसापेक्षा 83% ज्यास्त आहे. 
- चेन्नईत 1 महिन्यातील 70% पाऊस 3 दिवसात झाला आहे. मंगळवारी 169 मिमी पाऊस झाला होता.
- 2013 मध्ये ऑक्टोबर महिन्यात 394 मिमी पाऊस पडला होता. 
- चेन्नईत 1 डिसेंबर 2012 रोजी 12 तासात 272 मिमी पाऊस पडला होता.
 
#सरकारची मदत-
 
- आपत्कालीन विभागाने लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे.
- किनारपट्टी लगत 115 रिलीफ कॅम्प बनवले आहेत. 
- एनडीआरएफची टीम्स समुद्रकिनारी भागात काम करत आहेत.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, जोरदार पावसामुळे कशी आहे चेन्नई व परिसराची स्थिती...
बातम्या आणखी आहेत...