आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tamil Nadu Government Announces Amma Cement Scheme For People News In Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तामिळनाडूत \'अम्मा सिमेंट\' लाँच, एका बॅगची किंमत फक्त 190 रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- तामिळनाडूत 'अम्मा सिमेंट' लाँच करण्यात आले. गरिबांना या सिमेंटची एक गोणी फक्त 190 रुपयांना मिळणार आहे. हे सिमेंट सरकार खासगी विक्रेत्यांकडून खरेदी करणार आहे. घर बांधण्यासाठी 775 गोण्या तर डागडुजीसाठी 100 गोण्या मिळणार आहेत. 'अम्मा कॅन्टिन', 'अम्मा मिनरल वॉटर' आणि इतर योजनांप्रमाणेच या योजनेला 'अम्मा सिमेंट' असे नाव नेण्यात आले आहे.

मुख्यमंत्री जयललिता यांनी यापूर्वी औषधे, खानावळ, मिनरल वॉटर, मीठ अशा काही गोष्टी राज्यातील जनतेला स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यात उत्पादन होणारे सिमेंट आणि बाहेरून होणारा पुरवठा याबाबत आपण नुकतीच अधिकार्‍यांशी चर्चा केली, असे जयललिता यांनी सांगितले.

तामिळनाडूला महिन्याला सरासरी 17-18 लाख टन सिमेंट लागते. त्यापैकी 4-4.5 लाख टन सिमेंटचा पुरवठा अविभाजित आंध्रातून होत होता. परंतु, आता तेथील कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग 80 ते 100 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे तामिळनाडूला होणार्‍या पुरवठ्यात 1.5 ते 3 लाख टन इतकी घट झाली. यामुळे खाजगी उत्पादकांना दर वाढविण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे, असे जयललिता यांनी निवेदनात म्हटले आहे.