आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सरकारी कार्यालयांतील अम्मांचे फोटो हटवा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची छायाचित्रे सरकारी कार्यालयांत लावण्यास तामिळनाडूत विरोध केला जात आहे. द्रमुकने हा आक्षेप घेतला आहे. जयललिता यांचा जन्मदिन करदात्यांच्या पैशांतून साजरा करण्यावरही तीव्र आक्षेप असल्याचे द्रमुक नेते एम.के.स्टॅलिन यांनी स्पष्ट केले आहे.
 
जयललिता यांच्या ६९ व्या जन्मदिनाचा कार्यक्रम सरकारी पैशांतून करणे योग्य नाही, असे सांगून द्रमुकने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्टॅलिन यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली. जयललिता ६६ कोटींहून अधिक संपत्तीच्या प्रकरणात दोषी आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीचे छायाचित्र सरकारी कार्यालयांतून लावणे योग्य ठरणार नाही. त्याशिवाय लोक कल्याणाच्या योजनांना जयललिता यांचे नावे देणे देखील पूर्णपणे चुकीचे आहे, असे द्रमुकने म्हटले आहे.  
 
आधी माफी मागा स्टॅलिन यांनी ही मागणी करून जयललिता यांचा अपमान केला आहे. त्यामुळे स्टॅलिन यांनी अगोदर जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी अण्णाद्रमुकने केली. जयललिता यांच्याबाबत द्रमुक नेत्यांनी अशिष्ट वागण्याचा नमुना दिला आहे, असा आरोप अण्णाद्रमुकचे सरचिटणीस दिनकरन यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...