आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशिकला-पन्नीरसेलवम गटांत तडजोडीच्या प्रयत्नांना वेग, आज सर्व आमदारांची बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शशिकला यांनी जनरल सेक्रेटरी पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. -सूत्र (फाईल) - Divya Marathi
शशिकला यांनी जनरल सेक्रेटरी पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. -सूत्र (फाईल)
चेन्नई - तामिळनाडूत जे. जयलिलाता यांच्या निधनानंतर दोन गटांत विभागलेल्या अन्नाद्रमुकला पुन्हा एकत्रित आणण्याच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेलवम यांच्या बंडखोरीनंतर एक गट तयार केला. तर, दुसऱ्या गटाचे नेतृत्व पक्षाच्या जनरल सेक्रेटरी शशिकला आणि त्यांचा पुतण्या टीटीव्ही करत आहेत. या दोन्ही गटांच्या मंत्र्यांमध्ये बैठक झाली असून एकत्रित येण्यावर सहमती झाल्याचे सुत्रांकडून समजते. यासोबतच, मंगळवारी सर्वच आमदारांची बैठक होणार पार पडणार आहे. 
 
शशिकला पद सोडण्यास तयार
- दिनाकरण आणि शशीकला यांची तुरुंगात भेट झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत शशिकला यांनी अन्नाद्रमुकचे जनरल सेक्रेटरी पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. 
- राज्यातील महत्वाचे मंत्री के थंगामणी यांच्या सरकारी निवासस्थानी सोमवारी रात्री मंत्र्यांची बैठक पार पडली. यात 25 आमदार आणि अनेक बडे मंत्री सहभागी झाले होते. यानंतर मंगळवारी महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळेच, सर्व आमदार आणि मंत्री चेन्नईत थांबले आहेत. 
- बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अर्थमंत्री डी. जयकुमार यांनीच दोन्ही गटांमध्ये मतभेद दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दिली. काही प्रमाणात तोडगा काढण्यात आला, तरीही काही मुद्द्यांवर आणखी चर्चा केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या बैठकीत पन्नीरसेलवम गैरहजर होते.
- पक्षाने पुन्हा एकजूट होऊन राज्यातील कार्यकाळ पूर्ण करावा अशी सर्व आमदार आणि मंत्र्यांची इच्छा आहे. 
 
शशिकला गटात बंडखोरीची चर्चा
- पक्षातील सुत्रांच्या माहितीप्रमाणे, अन्नाद्रमुकमध्ये दोन गट पडले असतानाच आता शशिकला यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा बंडखोरीचा सूर उमटत आहे. दिनाकरण यांच्या विरोधात दिल्लीत एफआयआर दाखल झाल्यानंतर ही चर्चा सुरू झाली. त्यांच्या विरोधात पोटनिवडणुकीत एका निवडणूक अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत. 
 
अन्नाद्रमुकमध्ये दोन गट कधी झाले?
- जयललिता यांनी तब्येतीच्या कारणावरून पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्री केले होते. 
- मात्र, जयललिता यांच्या मृत्यूनंतर शशिकला गट सक्रीय झाला. याच गटाच्या दबावामुळे पन्नीरसेलवम यांना राजीनामा द्यावा लागला आणि शशिकला यांना पक्षाचे जनरल सक्रेटरी करण्यात आले. 
- यानंतर पन्नीरसेलवम यांनी शशिकला यांच्या विरोधात मोर्चा उघडला. आपल्याकडून बळजबरी राजीनामा घेण्यादत आला असे आरोप त्यांनी लावले. तामिळनाडूच्या जनतेला हवे असेल तर, मी आपला राजीनामा परत घेतो असेही ते म्हणाले होते. त्यावेळी 40 मिनिटे जयललिता यांच्या समाधीवर मौन बाळगून बसले होते. 
- तरीही, शशिकला यांच्या गटानेच विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवले. 
 
शशिकला बेंगळुरू तुरुंगात 
- शशिकला बेहिशेबी मालमत्ता (डिसप्रपोर्शनेट एसेट-DA) प्रकरणी तुरुंगात आहेत. फेब्रुवारी महिन्यात सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा आदेश रद्द करून कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शशिकला यांना सुनावलेली 4 वर्षांची कैद वैध ठरवली.
- या प्रकरणी शशिकला यांनी 6 महिन्यांची शिक्षा पूर्ण केली असून आणखी साडे तीन वर्षे तुरुंगात राहावे लागणार आहे. याबरोबरच शशिकला यांचे राजकीय आयुष्य संपुष्टात येईल. 4 वर्षे तुरुंगात आणि 6 वर्षे निवडणूक लढविण्याची बंदी असा 10 वर्षांचा काळ त्यांना राजकारणाच्या बाहेरच घालावा लागणार आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...