हैदराबाद - तेलंगणातील पोलिस दलात बदल करण्यासाठी गठित टास्क फोर्सने उपनिरीक्षक पदापर्यंत भरतीत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच राज्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये एक महिला रिसेप्शनिस्ट, समुपदेशक असावी, अशी शिफारसही करण्यात आली आहे.
तेलंगणाचे पोलिस महासंचालक अनुराग शर्मा यांनी ही माहिती दिली. महिलांविषयक समस्या सोडवण्यासाठी पोलिस दलातील महिलांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यामुळेच टास्क फोर्सने सिव्हिल पोिलसांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के, तर शस्त्रधारी पोलिस दलात १० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव ठेवला आहे. तामिळनाडू पोलिसांत सध्या महिलांचे प्रमाण ८ ते ९ टक्के आहे.टास्क फोर्सच्या या प्रस्तावावर सोशल मीडियातून प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत.