आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमिळनाडू: बस डेपोतील विश्रामगृहाचे छत कोसळले, 8 कर्मचार्‍यांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिरुवनंतपुरम- तमिळनाडुतील नागापट्टीनम येथील बस डेपोतील विश्रामगृहाचे छत कोसळून आठ जणांचा दबून मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवार) सकाळी ही घटना घडली. मृतांमध्ये बस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. ते रात्री विश्रामगृहात विश्रांती घेत होते.

65 वर्षे जुनी होती इमारत...
-पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना करईकाल येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून ढिगारा बाजुला करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मृतांची संख्येत वाढ होऊ शकते.
- दुर्घटनाग्रस्त इमारत 65 वर्षे जुनी होती. 1952 मध्ये या इमारतीचे बांधकाम झाले होते.
- इमारतीच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे पडले होते. परंतु प्रशासनाचे त्याकडे लक्ष नव्हते.

मृतांच्या कुटुंबियांना मदत आणि नोकरीची घोषणा
 - मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी सांगितले की, मृतांच्या कुटुंब‍ियांना 7.5 लाख रुपये मद  आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येणार आहे.
- गंभीर जखमी झालेल्या कर्मचार्‍यांना 1.5 लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी दिले चौकशीचे आदेश...
- पोरायर डेपोत पहाटे 3:30 वाजता ही घटना घडली.
- घटनेची माहिती मिळताच नागापट्टनमचे जिल्हाधिकारी डॉ. सी सुरेश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
- राज्य परिवहन मंत्री एमआर विजयाभास्कर देखील घटनास्थळाकडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... दुर्घटनेची भीषणता दर्शवणारे फोटो...
बातम्या आणखी आहेत...