आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tamil Superstar Rajnikanth Hints At Entering Politics

तामीळ सुपरस्टार रजनीकांतचे राजकारण प्रवेशाचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- तामीळ सुपरस्टार रजनीकांत याने राजकारणात प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत रविवारी रात्री दिले.
‘देवाने दाखवलेल्या दिशेप्रमाणे मी काम करत आहे. मी राजकारणात यावे अशी त्याची इच्छा असेल तर मी लोकांची सेवा करेन. राजकारण हे क्षेत्र धोकादायक तसेच गहन आहे. मी घाबरत नाही, पण मी द्विधा मन:स्थितीत आहे. राजकारणासाठी तुमचा पाया भक्कम असावा लागतो,’ असे रजनीकांतने म्हटले. ‘लिंगा’ या चित्रपटाच्या ध्वनिचित्र फित ट्रेलरच्या लाँचप्रसंगी तो बोलत होता. रजनीकांतने आपल्या पक्षात यावे यासाठी अनेकांनी प्रयत्नही केले होते. आता तो एखाद्या पक्षात जातो की स्वत:चा पक्ष काढतो हे पाहावे लागेल.