आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची तामिळनाडूमध्ये मुसंडी मारण्यासाठी तयारी, राज्यात २०१६ मध्ये विधानसभा निवडणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडूतीलराजकीय अस्थिरतेचा फायदा घ्या आिण पक्ष वाढवा, असा कानमंत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. अण्णाद्रमुकच्या प्रमुख माजी मुख्यमंत्री जयललिता बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात अडकल्या आहेत, तर द्रमुकच्या दोन बड्या नेत्यांमागे टूजी घोटाळ्याचा ससेमिरा आहे. अशा वेळी आपल्याला चांगली संधी आहे, असे शहा यांनी म्हटले आहे. राज्यात येत्या २०१६ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.
शहा यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना हिंदीतून मार्गदर्शन केले. बुथपातळीवर सदस्य नोंदणी वाढवा, लोकांमध्ये मिसळा, संपर्क वाढवा असे सल्ले त्यांनी दिले. जयललितांमुळे निर्माण झालेली पोकळी, द्रमुकमधील सुंदोपसुंदी आपल्या पथ्यावर पडेल, असे ते म्हणाल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. तथापि, बैठकीतील तपशील सांगण्यास मात्र त्याने नकार दिला. भाजपने महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकीत बाजी माराली. झारखंड विधानसभेतही पक्षाला बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. शिवाय जम्मू-काश्मिरातही पक्ष किंगमेकर ठरण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने आता दक्षिण पादाक्रांत करण्याची मोहीम आखल्याचे यावरून स्पष्ट होते.