आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यज्ञ-याग करत आहेत लालू, कोट्यवधी रुपये खर्च होत आहे तंत्र-मंत्रावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवडी मंदिरात लालू आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यांनी पूजा केली होती - फाइल फोटो - Divya Marathi
देवडी मंदिरात लालू आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यांनी पूजा केली होती - फाइल फोटो
पाटणा - राजकीय नेते भाषणांमधून तंत्र-मंत्र, जादू-टोना यांना अंधविश्वास सांगत असले तरी स्वतःच्या यश आणि भरभराटीसाठी या मार्गाचा अवलंब करण्यापासून मागे राहात नाहीत. बिहारमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या (16 ऑक्टोबर) मतदान होत आहे. त्यासाठी नेते शक्तीपीठ आणि मंदिरांमध्ये यज्ञ करण्यात मग्न झाले आहेत. यात राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू यादव देखील मागे नाहीत. लालू यादवांची संमोहन शास्त्रावर विशेष पकड असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या भाषणाला लोक गर्दी करतात आणि लक्षपूर्वक ते ऐकत असतात. ही त्यांच्या संमोहन अस्त्राची जादू असल्याचे विरोधक बोलत असतात. या निवडणुकीतही ते तंत्र-मंत्रावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत.

नवरात्रीच्या काळात तांत्रिक साधनेचे विशेष महत्त्व असते. लालू यादवांचा यावर विश्वास असल्याचे सांगितले जाते. नोव्हेंबर 2003 मध्ये त्यांनी राजस्थानातील आहोर येथे विशेष अनुष्ठान केले होते. यावेळी त्यांनी येथील मंदिरात रात्रभर जप केला होता. त्यांच्या या देवभोळेपणाचे दुसरे उदाहरण चारा घोटाळ्यात शिक्षा होऊन जामिनावर सुटल्यानंतर पाहायला मिळाले होते. बिरसा मुंडा तुरुंगातून ते थेट झारखंडच्या देवडी मंदिरात पोहोचले होते. तिथे त्यांनी यज्ञ केला आणि त्यानंतर घरी गेले होते.

रोज सुरु आहे तंत्र-मंत्र उपाय
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत फक्त राजदच नाही तर बहुतेक सर्वच पक्षांचे उमेदवार तंत्र-मंत्राचा आणि यज्ञाचा मार्ग अवलंबत आहेत. प्रथम तिकीट मिळण्यासाठी जप आणि आता स्वतःच्या विजयाबरोबर विरोधकांच्या पराभवासाठी यज्ञ सुरु आहेत. काही जण तर अघोरी तंत्राची अवलंब करत आहेत. रात्रीचे स्मशानात जाऊन तिथे पुजा केली जात आहे.
पुढील स्लाइडमध्ये, जाणून घ्या कोणकोणते उपाय केले जातात निवडणूक काळात