आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tapas Paul Another Controversial Video Surfaces, MP Asks Party Workers To Kill CPM Workers

वादग्रस्त वक्तव्य : तापस यांचा जीव घेऊ का? ममता बॅनर्जींचा पत्रकारांना प्रतिप्रश्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - माकप कार्यकर्त्यांवर बलात्कार आणि हत्या करण्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार तापस पाल यांचा आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जेव्हा तापस यांच्या विरोधात कारवाईसंदर्भात विचारणा करण्यात आली, त्यावेळी त्यांनी तापस यांना शिक्षा म्हणून ठार करायचे का, असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला आहे. मंगळवारी समोर आलेल्या या व्हीडीओमध्ये तापस विरोधकांचा गळा कापण्याचे वक्तव्य करत असल्याचे आढळून आले आहे.
टीएमसीच्या आणखी एका नेत्यानेही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बाकुंडा जिल्ह्याच्या आणखी एका नेत्यानेही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जिल्ह्याचे प्रभारी अरूप चक्रवर्ती यांनी त्यांच्या समर्थकांना घुसखोरांच्या हत्या करण्यासाठी प्रोत्साहीत केले.

तापस यांचा आणखी एक व्हिडीओ
ताज्या व्हिडीओमध्ये तापस पाल माकपला शिवीगाळ करण्याबरोबरच समर्थकांना विरोधकांचा गळा कापण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. या व्हि़डीओत ते म्हणत आहेत, ' जोपर्यंत मी येथे आहे, तपर्यंत माकपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला सोडू नका, असे मी सांगेन. आमचे लोक त्यांना मारून टाकतील. मी महिलांनाही अशी अपील करतो की, त्यांनी माकप कार्यकर्त्यांचे गळे कापावे.'

ममता म्हणाल्या - जीव घेऊ का?
ममता बॅनर्जी यांनी पाल यांचे वक्तव्य ही मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. मात्र पक्ष त्यांच्या विरोधात कारवाई करणार असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी पाल यांचा जीव घ्यायला हवा का? असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. त्या म्हणाल्या, 'पाल यांचे वक्तव्य ही केवळ चूक नाही, तर मोठी चूक आहे. आम्ही आवश्यक ती पावले उचलली आहेत. हे वैयक्तीक अभिव्‍यक्तीचे प्रकरण आहे. तुम्हाला काय हवे आहे? मी त्यांची हत्या करायला हवी का? मी काय करू शकते?'

पुढील स्लाइडमध्ये वाचा पाल यांचा पहिला व्हिडीओ...