आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लव्ह जिहाद: कोलकाता येथील सीबीआयचे न्यायाधिश रकीबुलचे नातेवाईक, चौकशी सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- रंजीत कोहली उर्फ रकीबुल आणि तारा सहादेव 'लव्ह जिहाद' प्रकरणाला आता अनेक कंगोरे फुटले आहे. रकीबुलचे अनेक बड्या लोकांशी संबंध असल्याचे उघड झाले असताना कोलकाता येथील एक न्यायाधिश त्याचे नातेवाईक असल्याची माहिती बुधवारी आली समोर आहे. यापूर्वी रकीकुलचे झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशातील न्यायाधिशांशी चांगले संबंध असल्याचे समोर आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथील सीबीआयचे न्यायाधीशांसोबत त्याचे चांगले संबंध होते. मागील महिन्यात रकीबुल त्यांच्या घरी पूजेसाठीही गेला होता, असे स्वत: रकीबुलने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. विशेष म्हणजे डीएसपी अनिमेष नैथानी यांची भेट घेऊन उंटारीचे डीएसपी सुरजीत सिंह यांचा संदर्भ दिला होता. डीएसपी सुरजीत यांच्या नावाचा संदर्भ दिल्यानंतर डीएसपी अनिमेष नैथानी यांनी रकीबुल आणि सीबीआयचे न्यायाधिशांची व्हीआयपी व्यवस्था केली होती. याबाबत डीएसपी अनिमेष नैथानी यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. आहे.

दरम्यान, रंजीत कोहली ऊर्फ रकीबुलची मागील तीस तासांपासून कोणतीही चौकशी झाली नाही. जिल्हा पोलिस, आयबीचे पथक, सीआयडीने रकीबुलची कोणतीही चौकशी केली नाही. पोलिसांनी चौकशीसाठी रकीबुलला रिमांडसाठी घेतले आहे. परंतु यादरम्यान पोलिसांनी त्याला एकही प्रश्न विचारलेला नाही. कोहलीची पोलिस कोठडी आज (गुरुवारी) सायंकाळी संपणार आहे.

रकीबुलकडून महत्तपूर्ण धागेदोरे मिळू शकतात, असा दावा पोलिसांनी केला असला तरी पोलिस त्याची चौकशी का करत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोहलीला मंगळवारी सायंकाळी सहा वाजता जगन्नाथपूर पोलिस ठाण्यातून चुटीया ठाण्यात आणले होते. मात्र, चुटीया पोलिस ठाण्यातील एकाही अधिकार्‍याने कोहलीची आतापर्यंत चौकशी केलेली नाही.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सीआयडी आणि आयबीच्या पथकाला पाठवले परत...