रांची- रंजीत कोहली ऊर्फ रकीबुल हसन आणि तारा शाहदेव यांच्या 'लव्ह जिहाद' प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. रकीबुलने एकदा तारा भाभीला (तारा शाहदेव) जबर मारहाण केली होती. तारा भाभीचा गाल, ओठ आणि पाठीवर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या, असा धक्कादायक खुलासा रकीबुलच्या घरी काम करणारी मोलकरीण हरीमती हिने केला आहे.
एवढेच नव्हे तर रकीबुल आणि ताराच्या निकाहला ताराचे आई-वडीलही आले नव्हते. पाहुण्यांमध्ये रकीबुल याच्या नातेवाईकांचीच गर्दी जास्त होती, असेही हरीमतीने दैनिक भास्करच्या प्रतिनिधीला माहिती दिली.
हरीमती म्हणाली, निकाहची वेळ आली तरी तारा शाहदेव हिच्या कुटूंबातील एकही सदस्य दिसत नसल्याने आश्चर्य वाटत होते. कदाचित त्यांना या निकाहबाबत माहिती नसावी. रंजीत याच्या घरी एक दाढी असलेले पांढरी पगडी असलेले नेताजी नेहमी येत असत. त्यांचे नाव सांगता येणार नाही, परंतु रंजीत त्यांचा खूप आदर करत होता. त्यांची चांगली व्यवस्थाही ठेवत होता. याशिवाय अनेक तरुणी रंजीतला भेटण्यासाठी येत होत्या. त्यात रिचा नामक तरुणी तर नेहमी येत होती.
दरम्यान, सिल्ली येथील हेसाडीह गावात जाऊन 'दैनिक भास्कर'च्या प्रतिनिधीने 14 वर्षीय हरीमतीसोबत संवाद साधला. प्रतिनिधीसोबत बोलताना हरीभती थोडी घाबरत होती. परंतु काही वेळानंतर तिने रंजित सिंह ऊर्फ रकीबुल आणि तारा शाहदेव यांच्या प्रकरणावर प्रकाश टाकला.
हरीमती म्हणाली, रिचा नामक एक तरुणी रंजीतला भेटण्यासाठी येत असे. तीन-चार वेळा तिला रंजीतसोबत पाहिले होते. विशेष म्हणजे रिचा प्रत्येकादा वेगवेगळ्या तरुणींसोबत येत होती. रंजीतने रिचाचे अॅडमिशन एका कॉलेजमध्ये केले होते. त्यानंतर मात्र रिचाचे घरी येणेजाणे वाढले होते. रंचीतला ती सर म्हणून हाक मारत होती. रिचा वहिनी असल्याचे रंजित सांगायचा. परंतु रिचाच्या नवर्याला आपण कधी पाहिले नसल्याचेही हरीमतीने सांगितले.
रंजीतची अनेक मोठ्या लोकांशी ओळख होती. लाल, पिवळ्या दिव्याच्या गाड्यांमधून अनेक नेते आणि अधिकारी रंजीतला भेटालयला येत असत. रंजीतचा घरी येण्याचा निश्चित वेळ नव्हती. तो रात्री उशीरा यायचा तर कधी घरीही येत नसे.
निकाहला ताराच्या कुटूंबातील एकही सदस्य आला नव्हता...
रंजीत आणि ताराच्या निकाहची धामधूम सुरु होती. परंतु ताराच्या कुटूंबातील एकही सदस्या यावेळी उपस्थित नव्हता. ताराला तीन वेळा 'कबूल', 'कबूल', 'कबूल' असे म्हणण्यास सांगण्यात आले होते. नंतर मात्र तारा नाराज झाली. माहेरी जाण्याची ती सारखी संधी शोधत होती.
रकीबुलच्या घरी कोण कोण येत होते? त्यांना ओळखतेस?
एक दाढी असलेले पांढरी पगडी घातलेले नेताजी रकीबुलच्या घरी येत होते. रंजीत त्यांची चांगल्या प्रकारे आदरतिथ्यही करत होता. ती व्यक्ती राजकीय पुढारी असतील असे त्यांच्या वेशभूषेवरून वाटत होते. मुश्ताक अंकल हे तर रंजीतच्या घरी नेहमी येत होते. माझ्यासोबतही त्यांची चांगली ओळख झाली होती. अन्य लोकांना नावाने ओळखू शकत नाही. परंतु ते जर पुन्हा समोर आल्यास ओळखेल. रोहित नामक एक तरुण रंजीतकडे येत होत. रंजीत आणि त्याची चांगली गट्टी जमली होती.
तारा शाहदेवला कधी रंजीतला मारहाण करताना पाहिले होते का?
एके दिवशी तारा भाभी रडताना दिसली. तिला विचारले असता रंजीतने मारहाण केल्याचे तिने सांगितले. ताराचा गाल, पाठ आणि ओठांवर अनेक जखमा दिसत होत्या. त्यामुळे तारा शाहदेवने घर सोडून निघून गेल्याचा मला संशय होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, रंजीत कोहलीच्या निकाह समारंभात सहभागी झालेले झारखंड विधानसभेचे माजी अध्यक्ष व चतराचे माजी खासदार इंदर सिंह व अन्य नामदार
(फोटो: रकीबुलच्या घरी काम करणारी मोलकरीण हरिमती)