आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तारिषीसाठी फराजने लावली जीवाची बाजी, गुडगावमध्ये केले अंत्यसंस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिरोजाबाद- बांगलादेशाची राजधानी ढाक्‍यात एका रेस्तराँमध्ये शुक्रवारी ISISच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय तारिषी जैनने जीव गमावला. ती ढाक्‍यात सुट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. दरम्यान, आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत गुलशान परिसरातील आर्टिसन रेस्तराँमध्ये गेली होती त्याचवेळी दहशतवाद्यांनी तिथे हल्ला केला होता.
तारिषी जैनच्या पार्थिवावर सोमवारी गुडगाव येथे अंत्यसंस्कार करण्‍यात आले. ढाका येथून तिचे पार्थिव दिल्लीला आणण्यात आले. त्‍यानंतर शव गुडगाव येथे नेण्‍यात आले. श्रद्धांजली देण्‍यासाठी येथे लोकांची गर्दी होत आहे. रेस्तराँमध्ये हल्ला झाला तेव्हा तारीषी तिचे दोन मित्र अंबिता कबीर व फराज हुसैनसोबत होती.

तारीषीसाठी फराजने लावली जीवाची बाजी...
- प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 20 वर्षीय फराजने आपल्या दोन मैत्रिणींसाठी जीवाची बाजी लावली. हल्ला झाला तेव्हा फराज, तारिषी व अंबिता रेस्तराँमध्ये होते.
- दहशतवाद्यांनी रेस्तराँमधील लोकांना त्यांची ओळख विचारून-विचारुन ठार मारले. बांगलादेशी नागरिक असल्याने दहशतवाद्यांनी फराजला रेस्तराँमधून जाण्यास सांगितले होते. पण, त्याने तारिषी व अंबिताची साथ सोडली नाही.
- 19 वर्षीय तारिषी भारतीय वंशाची होती. तर, अंबिता ही बांगलादेशाची नागरीक होती. पण ती अमेरिकेत शिक्षण घेत असल्याने दहशतवाद्यांनी दोघींना मारले. त्यानंतर फराजलाही गोळ्या घातल्या.
- तारिषी व अंबिताने त्या रात्री वेस्टर्न आउटफिट परिधान केले होते. तिघे इफ्तारनंतर कॅफेत गेले होते.
- दहशतवाद्यांनी फराजला दोघांची ओळख विचारली. नंतर त्यांनी दोघींना ठार मारले. फराजला रेस्तराँबाहेर जाण्यास सांगितले. पण त्याने त्यांचे ऐकले नाही. तो तिथेच थांबला. नंतर दहशतवाद्यांनी त्यालाही मारले.
फिरोजाबादमध्ये होणार होते अंत्यसंस्कार
- तारिषीच्या पार्थिवावर फिरोजाबाद येथे अंत्यसंस्कार करण्‍याचा निर्णय तिच्या नातेवाईकांना घेतला होता. पण. तारिषीचे पार्थिव दिल्लीत आणण्यास उशीर झाला. त्यामुळे तिच्या पार्थिवावर गुडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
- गुडगावमध्ये तारिषीच्या वडिलांचे एक घर आहे.
- तारिषीचे काका राजीव जैन, राकेश मोहन व अजीत जैन तिथे राहातात.
पुढील स्लाइडवर वाचा, कॅलिफोर्नियामध्ये अर्थशास्त्राची विद्यार्थिनी होती तारिषी
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...