आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tarun Tejpal Was Arrested At Goa For Sexually Assaulting A Young Colleague

अखेर ‘तहलका’चे संपादक तेजपाल अटकेत; अटकपूर्व जामीन फेटाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- सहकारी पत्रकार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांना अखेर गोवा पोलिसांनी शनिवारी अटक केली. 2 दिवसांच्या युक्तिवादानंतर न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी तेजपाल यांचा अटकपूर्व जामीन रात्री फेटाळला. या वेळी तेजपाल गुन्हे शाखेत होते. निकाल जाहीर होताच त्यांना अटक झाली. घटनेच्या 23 दिवसांनंतर ही कारवाई होऊ शकली. 22 नोव्हेंबरला पीडितेने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या काळात तेजपाल यांनी बचावासाठी आटोकाट प्रयत्न केले.
कसून चौकशी होणार
>तपास पथक कसून चौकशी करेल
>अटकेनंतर 24 तासांत कोर्टात हजर करावे लागेल
>पोलिस कोठडी मागू शकतात
>तपासानंतर आरोपपत्र दाखल होईल
तेजपाल हायकोर्टात जाऊ शकतात.

पुढील स्लाइड्सवर वाचा, 'ती मुलगी शांत का राहिली?'