आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात जमा झाले 98 अब्ज रुपये, म्हणाला- मला तुरुंगात पाठवू नका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरनाला (पंजाब)- टॅक्सी चालवून दररोज कसेबसे 500 रुपये कमविणारा टॅक्सी चालक एका रात्रीत अब्जाधिश झाला. याचा त्याला एवढा धक्का बसला, की त्याने थेट इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. साहेब मला तुरुंगात पाठवू नका. मला माहिती नाही ही रक्कम कोठून आली. प्लीज याची चौकशी करा. घडलेल्या प्रकाराने तो चांगलाच घाबरला होता.
अकाऊंटंटच्या चुकीने पैसे झाले ट्रान्सफर
- बलविंदरसिंग असे या खातेदाराचे नाव आहे. घडलेल्या प्रकाराने त्याला चांगलाच मनस्ताप झाला आहे.
- मोबाईलवर पैसे जमा झाल्याच्या एसएमएस आला तेव्हापासून त्याची झोपच उडाली आहे.
- बॅंक अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला आहे. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरचे अकाऊंट ब्लॉक केले. त्यानंतर पुन्हा खाते नव्याने उघडून त्याची कॉपी ड्रायव्हरला दिली.
- स्टेट बॅंक ऑफ पटीयालाचे मॅनेजर रविंदर कुमार यांनी सांगितले, की ही तांत्रिक चुक आहे. आम्ही ही एन्ट्री रिव्हर्स केली आहे. त्यांच्या खात्यात चुकून जमा झालेले पैसे परत घेण्यात आले आहेत.
- बॅंक अकाऊंटंटकडून चुकून अमाऊंच्या जागी अकाऊंट नंबर लिहिला गेला होता. त्यामुळे हा घोळ झाला होता.
एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पैसे न्यायचा बलविंदरसिंग
- बलविंदरसिंग गेल्या तीन महिन्यांपासून स्टेट बॅंक ऑफ पटियालाच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पैसे नेण्या-आणण्याचे काम करतो. त्याला एका फेरीसाठी 200 रुपये मिळतात.
- दरवेळी प्रमाणे त्याने एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पैसे नेले. त्याचे व्हाऊचर भरुन बॅंकेला दिले. त्यावर रक्कम लिहिली नव्हती.
- व्हाऊचर जमा करताना अकाऊंटंटने पैशांच्या जागी अकाऊंट नंबर टाकला. त्यामुळे ती रक्कम बलविंदरसिंग यांच्या खात्यात जमा झाली.
- बरनालमध्ये स्टेट बॅंक ऑफ पटीयालाच्या तीन शाखा आहेत. तिनही शाखांमध्ये पैसे पोहोचविण्याचे काम बलविंदर करतो.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...