आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TDP खासदारांची दादागिरी; स्टाफला शि‍वीगाळ करत प्रिंटर फेकले, 6 एअरलाइन्सने घातली बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- तेलुगू देसम पक्षाचे खासदार जे.सी.दिवाकर रेड्डी यांनी विशाखापट्टणम एअरपोर्टवर 'दादागिरी' केल्याचे समोर आले आहे. एअरपोर्टवर स्टाफसोबत गैरवर्तवणूक केल्याने एअर इंडियासह 6 एअरलाइन्सने दिवाकर रेड्डी यांना 'नो-फ्लाय' लिस्टमध्ये टाकले आहे. इंडिगो, स्पाइसजेट, गोएअर, जेट एअरवेज आणि विस्तारा एअरलाइन्सनेही रेड्डी यांच्या विमानप्रवासावर बंद घातली आहे. रेड्डी हे आंध्र प्रदेशातील अनंतपूरमधून टीडीपीचे खासदार आहेत.

खासदार रेड्डी यांना हैदराबादला जायचे होते. मात्र, ते विषाखापट्टनम एअरपोर्टवर तब्बल 22 मिनिटे उशिरा पोहोचले. तोपर्यंत ‍इंडिगो एअरलाइन्सचे काउंटर बंद झाले होते. त्यामुळे इंडिगो एअरलाईनने त्यांना विमानात जाण्यापासून रोखले. बोर्डिंग पास न मिळाले खासदार रेड्डी यांनी एअरलाइन्स स्टाफसोबत कूरबुरी झाली. काउंटरवरील स्टाफला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. प्रिंटर खाली फेकले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या स्टाफरला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना 'नो-फ्लाय लिस्ट'मध्ये टाकण्यात आले होते.

इंडिगो एअरलाईन्ससह, एअर इंडिया, स्पाईस जेटजेट,  एअरवेज, विस्तारा या कंपन्यांन खासदार रेड्डी यांना प्रवास बंदी घातली आहे. दरम्यान, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि टीडीपीचे नेते अशोक गजपती हे खासदार रेड्डींबाबत काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...