आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याच्या हाती लागला शिक्षकाच्या मोबाइलमधील अश्लील व्हिडिओ, नंतर समोर आले हे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- कोचिंग क्लासमधील एका विद्यार्थ्याने एक अश्लील व्हिडिओ व्हायरल करून शिक्षकाच्या 'कृष्‍णकृत्य' चव्हाट्यावर आणले आहेत. नराधम शिक्षक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत होता. इतकेच नाही तर त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेलही करत होता. मनोज यादव असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.  
 
विद्यार्थ्याने असा व्हायरल केला अश्लील व्हिडिओ...
- बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील सासाराममधील तेलकप येथील ही घटना आहे. झाले असे की, एके दिवशी आरोप क्लासमध्ये मोबाइल विसरला. तोच मोबाइल कोचिंगमधील एका विद्यार्थ्याच्या हाती लागला. मोबाइलमधील अश्लील व्हिडिओ पाहून त्याने तो स्वत:च्या मोबाइलमध्ये घेतला. त्यानंतर शिक्षकांचे पितळ सगळ्यांसमोर उघडे केले.

विद्यार्थ्याने रात्रीतून व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला. त्यावर शिक्षकाचा अश्लील व्हिडिओ शेअर केला. नंतर इतर विद्यार्थ्यांनी तो दुसर्‍या ग्रुपवर शेअर केला.
- शिक्षकाचा अश्लील व्हिडिओ सर्वत्र पोस्ट केल्यानंतर विद्यार्थ्याने चपळाईने व्हॉट्‍सअॅप ग्रुप डिलिट केला.

तेलकपमधील लोकांना शिक्षकाच्या कारनामे समजल्यानंतर त्यांनी कोचिंग क्लासवर हल्लाबोल केला. नराधमाला अटक करा, अशी मागणी करत काही संतप्त‍ जमावाने डेहरी-सासाराम हायवेवर रास्ता रोको केला.
 
चार मुलांचा बाप आहे आरोपी शिक्षक...
- आरोपी मनोज यादव हा चार मुलांचा बाप आहे. तो अमझोरमध्ये पीपीसीएलद्वारा संचालित स्कूलमध्ये नोकरी करतो.
- नोकरीसोबत तो तेलकपमध्ये कोचिंग क्लास चालवत होता. त्यात अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी येत होत्या.
- ट्यूशनमध्ये येणार्‍या अल्पवयीन विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तो त्यांचे लैंगिक शोषण करत होता. त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करत होता.
- मनोज यादव विरोधात एका दलित मुलीची छेड काढल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला निलंबितही केले होते.
- अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी शिक्षक फरार आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...