आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड होते विद्यार्थिनीला, वॉशरूममधून निघताच शिक्षकाने केले असे कृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित मुलगी 8वीची विद्यार्थिनी आहे. - सिंबॉलिक - Divya Marathi
पीडित मुलगी 8वीची विद्यार्थिनी आहे. - सिंबॉलिक

कानपूर - येथे एका शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनीच्या छेडछाडीचे प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थिनीचे पीरियड सुरू होते, यामुळे ती वॉशरूममध्ये गेली होती, बाहेर आल्यावर शिक्षकाने विचारले- "काय बात आहे, आजकाल तू टॉयलेटला खूप जातेस!" याची माहिती मिळताच मुलीचे कुटुंबीय संतप्त होऊन शाळेत पोहोचले आणि प्रिन्सिपलना तक्रार केली. पोलिसांनी गुरुवारी प्रकरणाची नोंद केली असून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना कानपूरच्या सरदार पटेल इंटर कॉलेजमधील आहे. बाबू पुरवा कॉलनीत राहणारे अधिवक्ता दीपेंद्र (काल्पनिक नाव) म्हणाले, माझी 13 वर्षीय मुलगी पारुल (काल्पनिक नाव) 8वीची विद्यार्थिनी आहे.
- ते म्हणाले, माझ्या मुलीला पीरियड सुरू होते. ती जेव्हा शाळेच्या वॉशरूममधून बाहेर निघाली तेव्हा शिक्षक उमाशंकर कटियार यांनी घाणेरड्या मानसिकतेने विचारले की, काय बात आहे, आजकाल खूप टॉयलेटला जातेस. याआधी त्याने अशाच प्रकारे बोलून तिची छेड काढली होती. मुलगी शाळेतून परतली तेव्हा तिने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली."

- यानंतर आम्ही शाळेच्या प्रिन्सिपलना तक्रार करायला गेलो तेव्हा प्रिन्सिपलची वाइफ मीरा यादव म्हणाली- तुझ्यासारखे 1760 वकील येतात. एवढेच नाही, माझ्याशी उद्धट बोलून मारहाणही केली. यानंतर मी आरोपी शिक्षकाविरुद्ध बर्रा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. शिक्षकाविरुद्ध पॉक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
- याआधी आरोपी शिक्षकाने मुलीची छेड काढली होती, पण त्या वेळी आम्ही दुर्लक्ष केले होते.

 

आरोपी शिक्षकाने अनेक मुलींची काढली आहे छेड
- पीडित मुलगी म्हणाली, शिक्षक उमाशंकर अशाच प्रकारे बोलून इतर मुलींचीही छेड काढलेली आहे. पण जेव्हा त्याने मला असा घाणेरडा प्रश्न विचारला, मी लगेच आईला सांगितले.

 

काय म्हणतात पोलिस?
- पोलिस इन्स्पेक्टर भास्कर मिश्रा म्हणाले, मुलीने छेडछाडीची तक्रार केली आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली आहे. चौकशी सुरू आहे. तपासात जे काही समोर येईल त्यावरून कारवाई केली जाईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...