आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीसोबत केले तिसरे लग्‍न, ग्रामस्‍थांनी काढली धिंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चण्डी/नगरनौसा - बिहारमधील नालंदातील नगरनौसा येथील एका सरकारी शाळेतील शिक्षकाचे दोन लग्‍न झालेले असतानाही त्‍याने इयत्‍ता नववीतील एका विद्यार्थिनीला पळवून नेले. त्‍यामुळे संतप्‍त ग्रामस्‍थांनी त्‍याच्‍या गळ्यात चप्‍पलांचा हार घालून गावातून धिंड काढली. एवढेच नाही महिलांनी त्‍याला भर रस्‍त्‍यात झाडूने झोडपले आणि त्‍यांचे मुंडन केले.
शाळेतून मारहाण करत काढली धिंड...
> नालंदामधील नगरनौसा येथील शासकीय शाळेतील शिक्षक शैलेंद्र कुमार याने नववीतील विद्यार्थिनीला आपल्‍या प्रेम जाळ्यात ओढले.
> दोघांनाही पळून जाऊन लग्‍न केले.
> त्‍या नंतर शनिवारी शैलेंद्रकुमार हे शाळेत आले.
> या बाबत ग्रामस्‍थांना माहिती मिळताच ते शाळेत आले आणि त्‍यांनी शैलेंद्रकुमार यांना मारहाण करत त्‍यांची धिंड काढली.
20 ग्रामस्‍थांविरोधात तक्रार
या प्रकरणी शिक्षकाने दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे पोलिसांनी 20 ग्रामस्‍थांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...