आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याध्यापकांच्या दारी शिक्षकाची नित्य हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- एखादा शिक्षक शाळेच्या हजेरीपटावर नोंद करण्याऐवजी मुख्याध्यापकांच्या दरवाजावर आपली उपस्थिती नोंदवत असेल, तर त्याला काय म्हणाल? ऐकायला थोेडे त्रासदायक वाटत असले, तरी छत्तीसगडच्या जांजगीर जिल्ह्यातील सरकारी शाळा बरपालीमध्ये शिक्षक परमेश्वरदीन यादव यांच्याबाबत गेल्या तीन वर्षांपासून हे घडत आहे.

२५ जुलै २०१२ रोजी काढण्यात आलेल्या बदली आदेशामुळे ही स्थिती ओढावली आहे. त्यानुसार यादव यांना बरपालीहून जांजगीर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याच्या जागी अन्य तालुक्यात पाठवले जात होते. आदेशाचे पालन ३० जुलैपर्यंत होणे बंधनकारक होते. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आदेश ६ ऑगस्टला पोहोचला. सामान्य प्रशासनाच्या नियमांनुसार निश्चित मुदतीत आदेशाचे पालन न झाल्यास आदेश रद्दबातल मानला जातो. अवर सचिव एम. एन. राजूरकर यांच्या आदेशात आणखी एक त्रुटी होती. यादव यांची बदली एकाच यादीत दोनदा करण्यात आली होती. यादीत १०७ व्या क्रमांकावर डीईओएेवजी अन्य ठिकाणी आणि १४१ व्या क्रमांकावर बरपालीहून नगरदा शाळेत बदली करण्यात आली होती.

या कारणामुळे यादव यांनी मुख्याध्यापक महेशराम चंद्रा यांच्याकडे कार्यमुक्त न करण्याची विनंती केली होती. मात्र, दोन दिवसांनंतर त्यांना रिलिव्ह करण्यात आले. यादव तेव्हापासून दररोज शाळेत जात आहेत आणि मुख्याध्यापकाच्या दरवाजावर हजेरीची स्वाक्षरी करतात. यामुळे अनेकदा तणावाची स्थिती निर्माण होते आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचते. प्रकरण गुंतागुंतीचे असल्याची कबुली जिल्हा शिक्षण विभागाने दिली आहे.
कोर्टाचा दिलासा, मात्र यादव सैरभैर, प्रतिनियुक्तीचा आदेश
८ नोव्हेंबर २०१२ रोजी यादव यांना मिळालेल्या नोटिसीत वेतनवाढ रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. यादव यांनी प्रकरण उच्च न्यायालयात नेले. न्यायालयाने १ जुलै २०१३ रोजी यादव यांना दिलासा देत प्रतिनियुक्तीचा आदेश बजावला. त्यानंतर यादव यांना अधिकाऱ्यांनी डीपीआयमध्ये पाठवले. मात्र, त्या वेळेपासून ते नोकरीत स्थिर नाहीत.
बातम्या आणखी आहेत...