आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher Jumped In Canal During Protest In Bathinda

लाठीचार्जने संतप्त शिक्षिकेने घेतली नदीत उडी, वाचवण्यासाठी DSP आले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षिकेला वाचवण्यासाठी डीएसपी गुरुमीतसिंग किंगरा यांनी नदीत  उडी घेतली. - Divya Marathi
शिक्षिकेला वाचवण्यासाठी डीएसपी गुरुमीतसिंग किंगरा यांनी नदीत उडी घेतली.
भटिंडा - नियमीत करण्याच्या मागणीसाठी शेकडो शिक्षकांनी आंदोलन केले. शिक्षकांनी जेव्हा चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. त्यामुळे संतप्त शिक्षकांमधील एका शिक्षीकेने पुलावरुन नदीत उडी घेतली. तिच्या मागोमाग आणखी चार शिक्षकांनी नदीत उड्या घेतल्या. हे दृष्य पाहून त्यांना वाचवण्यासाठी तिथे तैनात डीएसपी गुरमीत सिंह किंगरा यांनी देखील नदीत उडी घेतली. त्यांच्यासोबत पोलिस निरीक्षक कौर सिंह यांनी देखील उडी मारली. तर, दुसरीकडे पुलावर उभ्या असलेल्या शिक्षकांना पोलिसांनी ओढून बाहेर काढले.
पोलिसांनी शिक्षकांना अट्टल गुन्हेगारांप्रमाणे केसांना पकडून ओढत नेले आणि बसमध्ये कोंबले. पोलिसांनी 400 शिक्षकांना अटक केली. चार बस, तीन जीप आणि दोन टाटा एस मध्ये भरून त्यांना पोलिस स्टेशनला नेले. पोलिसांची धक्काबुक्की आणि लाठीचार्जमध्ये होशियारपूर येथील अनु ठाकूर या शिक्षिकेचा हात फ्रॅक्चर झाला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत फोटो...