करीमनगर- गृहपाठ न केल्यामुळे शिक्षकांनी पाचवीतील विद्यार्थिनीला दिलेल्या कठोर शिक्षेने तिचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील करीमनगरजवळच्या हुजुराबाद येथील विवेकवर्धिनी शाळेत ही घटना घडली.
कोलिपका अश्रीथ या ९ वर्षांच्या विद्यार्थिनीला १६ जुलै रोजी गणिताच्या शिक्षकाने २० मिनिटे गुडघ्यांवर उभे राहण्याची शिक्षा केली. यामुळे तिची प्रकृती बिघडली. घरी गेल्यावर तिने गुडघे दुखत असल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी तिला तातडीने दवाखान्यात नेले. खूप वेळ गुडघ्यांवर उभे केल्याने गुडघ्यात रक्ताच्या गाठी झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. गुरुवारी सकाळी तिला वारंगलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच तिचे निधन झाले.