आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher Rape His 7 Year Old Girl Student At Bagalur

सात वर्षांच्या मुलीवर बंगळुरूत अत्याचार, ५०० हून अधिक लोकांकडून तोडफोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - येथील एका खासगी शाळेतील सात वर्षांच्या मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर बुधवारी पालकांचा संताप अनावर झाला. त्यांनी शाळेत धाव घेऊन तेथील फर्निचर आणि खिडक्यांची तोडफोड केली. या वेळी फर्निचरला आग लावण्याचा प्रयत्नही झाला.

साधारण ५०० लोकांचा जमाव शाळेवर चालून आला. त्यांनी आरोपी शारीरिक शिक्षकाला ताब्यात देण्याची मागणी लावून धरली. जमावाने एक मोटारसायकल जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपी शिक्षकाला घेऊन जात असताना पोलिस व जमावात चकमक उडाली. पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या संपूर्ण घटनेत २० जण जखमी झाले. यामध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे. घटनास्थळी पोहोचलेले पोलिस आयुक्त एम. एन. रेड्डी म्हणाले, आरोपीला अटक करण्यात आली असून स्थिती नियंत्रणात आहे. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

बंगळुरूमध्ये डिसेंबरपर्यंत अशा पाच घटना
बंगळुरूच्या खासगी शाळांमध्ये गेल्या काही महिन्यांत मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकार वाढले आहेत. डिसेंबरपर्यंत अशा पाच घटनांची नोंद झाली आहे. यामुळे पालकांना मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न भेडसावत आहे. परिणामी त्यांच्या संतापाचा उद्रेक आजच्या घटनेत दिसला.