आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणात शिक्षकांना जीन्स घालण्यास बंदी, शिक्षण विभागाचा फतवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - शिक्षकांनी शाळेत जीन्स घालू नये, त्याऐवजी साधासुधा पेहराव करावा, असा फतवा हरियाणाच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी काढला आहे. विभागाच्या आदेशात म्हटले आहे की, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे शिक्षक जीन्स घालून शाळेत येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ते काही कामानिमित्त संचालनालयातही जातात, जे चुकीचे आहे.

हरियाणा विद्यालय अध्यापक संघाने आदेशाला विरोध करत सरकार अपयश लपवण्यासाठी असे आदेश काढत असल्याची टीका केली. शिक्षकांना ड्रेस कोडची सक्ती चुकीची आहे. त्यांचे काम शिकवणे आहे, तो ते जीन्स वा धोती घालूनही करू शकतो, असे अध्यापक संघाचे अध्यक्ष वझीर सिंह यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...