मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि इन्व्हेस्टमेंट गुरू वॉरेन बफेट यांनी
आपली अब्जावधींची संपत्ती दान म्हणून दिली. मात्र ही मंडळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आहेत. भारतातील परमेश्वर दयाल, विरल शहा, शकूर मोहम्मद या लोकांजवळ केवळ त्यांचे वेतन आहे. मात्र तुटपुंज्या पैशात ते मोठा विचार रुजवत आहेत...
भिंचरी गावात सरकारी शाळेत १४ शिक्षक आहेत. १० वी मध्ये ८५ % पेक्षा जास्त गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना ते प्रत्येकी ३ लाख रुपये देणार आहेत. ते सुद्धा वेतनातून. आतापर्यंत ७० % गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना ते प्रत्येकी ११०० रुपये देत. या मोहिमेची सुरुवात त्यांनी ४ वर्षांपूर्वी केली. आतापर्यंत त्यांनी आपल्या वेतनातून ५० हजार रुपये वाटले आहेत. याचा चांगला परिणाम झाला. शाळेत विद्यार्थी वाढले. निकालही चांगले आले. या २६ जानेवारी रोजी मुख्याध्यापक परमेश्वर दयाल व शिक्षकांनी नवा निर्णय घेतला. १० वीत ८५ % मिळवणार्यांना ते प्रत्येकी ३ लाखांचे पॅकेज देणार आहेत. हे पैसे येत्या २ वर्षांत दिले जातील. त्यातून ११ वी व १२ वीचे शिक्षण विद्यार्थ्यांना करता येईल.
मजुराने शाळेसाठी दिली जमीन
जोधपूर। रोजंदारीवरील मजुराने १९८४ मध्ये ४ हजार रुपयांत ६ प्लॉट खरेदी केलेे. शकूर मोहम्मद नावाच्या या मजुराने एक प्लॉट रुग्णालयासाठी दान दिला. दुसरा प्लॉट शाळेसाठी व तिसरा मशिदीसाठी दान दिला. आता तो चौथा प्लॉट दान करणार आहे. शकूर म्हणतात, ‘ मी निरक्षर आहे. मुलांनी शिकावे असे वाटते. लोकांना आरोग्य सोयी मिळाव्यात.
५५ लाखांची एफडी, प्रत्येकाला शिक्षण मोफत
१९९६ मध्ये गावात एनआरआय स्नेहमिलन झाले. येथे शाळा उभारण्यासाठी चर्चा झाली. मात्र यासाठी अनुदान मिळणे अशक्य. गावातील एनआरआयने पुढाकार घेतला. खर्चासाठी ४० जणांनी ५५ लाख रुपये डिपॉझिट केले. १९९९ मध्ये शाळा सुरू झाली. एच. आय. पटेल प्राथमिक शाळेने मुलांसाठी विनामूल्य शिक्षण उपलब्ध केले.