आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India Captain Mahendra Singh Dhoni 34th Birthday

धोनीचा 34वा Birthday: नाही निघाला बंगल्याबाहेर, गाड्यांची केली दुरुस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करुन फोटो काढले - Divya Marathi
चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करुन फोटो काढले
रांची (झारखंड) - टीम इंडियाचा वन डे आणि टी-20 क्रिकेटचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी 34 वा वाढदिवस साजरा केला. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हरमू भागातील त्याच्या शौर्य बंगल्याबाहेर लोकांची रांग लागली होती. मात्र धोनी एकदाही बाहेर आला नाही. तो बंगल्यातील गॅरेजमध्ये बाइक दुरुस्त करत होता. त्यासोबतच त्याने इतरही गाड्यांची दुरुस्ती केली. त्यांचे ऑइल चेंज केले. प्रत्येक गाडी स्टार्ट करुन तिच्या फायरिंगचा अंदाज घेतला.
सकाळपासून फॅन्सची गर्दी
धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून बंगल्याबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यात काही दिल्ली तर काही बिहारमधून आले होते. काही चाहत्यांनी बॉल तर काहींनी बॅट सोबत आणल्या होत्या. त्यांना त्यावर धोनीचा ऑटोग्राफ हवा होता. तर प्रत्येकाच्याच हातात फुलांचे गुच्छ होते. धोनी घराबाहेर पडला नसला तरी काही चाहत्यांना त्याने घरात बोलावून त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करत त्यांच्यासोबत फोटो काढले.

धोनीच्या फेव्हरेट सलूनमध्ये केक कटिंग
रांचीत धोनीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमिताभ चौधरींनी धोनीचा वाढदिवस साजरा केला. चौधरींनी धोनीचे फेव्हरेट काया सलून येथे केक कटिंग केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, धोनीने केली गाड्यांची पाहाणी