आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिली कसाेटी/चाैथा दिवस; टीम इंडियाची सात वर्षांनंतर दुसऱ्या डावात शतकी भागीदारीची सलामी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलकाता- सलामीवीर युवा फलंदाज लाेकेश राहुल (नाबाद ७३) अाणि शिखर धवनने (९४) पहिल्या कसाेटीच्या पहिल्या डावातील अपयशाने संकटात सापडलेल्या टीम इंंडियाला सावरले. त्यामुळे यजमान भारताला रविवारी श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या डावामध्ये चाैथ्या दिवसअखेर १ बाद १७१ धावा काढता अाल्या. यासह भारताने ४९ धावांची अाघाडी मिळवली. अाता भारताचा लाेकेश राहुल अाणि चेतेश्वर पुजारा मैदानावर खेळत अाहेत. भारताने २०१० नंतर पहिल्यांदा दुसऱ्या डावामध्ये शतकी भागीदारीची सलामी दिली.   


तत्पूर्वी भुवनेश्वर  कुमार (४/८८), माे. शमी (४/१००) अाणि उमेश यादव (२/७९)  यांनी धारदार गाेलंदाजी करताना श्रीलंकेचा पहिला डाव २९४ धावांत गुंडाळला.     


लाेकेश-धवनचा झंझावात : भारताच्या सलामीवीर शिखर धवन अाणि लाेकेश राहुलने दुसऱ्या डावात झंझावाती खेळी केली. त्यांनी १६१ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. 

 
धवनचे शतक हुकले : शतकापासून  सहा पावलांवर असलेल्या  शिखर धवनची काहीशी निराशा झाली. त्याला शनाकाने डिकवेलाकरवी झेलबाद केले. शिखर धवनने ११६ चेंडूंचा सामना करताना ११ चाैकार व दाेन षटकारांच्या अाधारे ९४ धावांची खेळी केली. 

 

अाज पुजाराचा विक्रम;

१४० वर्षांनंतर नवव्यांदा घडणार असे : कसाेटी क्रिकेटच्या १४० वर्षांच्या इतिहासामधील एका उल्लेखनीय कामगिरीला अाता  चेतेश्वर पुजारा उजाळा देणार अाहे. कसाेटीचे पाचही दिवस फलंदाजी करण्याचा विक्रम पुजाराच्या नावे नाेंदवला जाईल. असे करणारा ताे दीड शतकामधील नववा फलंदाज ठरेल. यापूर्वी, हा पराक्रम भारताच्या रवी शास्त्रींच्याही नावे अाहे.

 

लाेकेश राहुलचे अर्धशतक 
युवा फलंदाज लाेकेश राहुलने शानदार अर्धशतक ठाेकले. त्याने ११३ चेंडूंमध्ये ८ चाैकारांच्या अाधारे नाबाद ७३ धावा काढल्या अाहेत.   

 

३४ वर्षांनंतर वेगवान गाेलंदाजांचे १० बळी 
भारताच्या वेगवान गाेलंदाजांनी काेलकात्याच्या खेळपट्टीवर भेदक मारा करताना श्रीलंकेचा डाव झटपट गुंडाळला. या वेळी   भुवनेश्वर कुमार (४/८८), माे. शमी (४/१००) अाणि उमेश यादव (२/७९) हे वेगवान गाेलंदाज चमकले. या तिघांनी ३४ वर्षांपूर्वीच्या कामगिरीला उजाळा दिला. यापूर्वी १९८३ मध्ये भारताच्या वेगवान गाेलंदाजांनी अहमदाबाद येथे विंडीजविरुद्ध कसाेटीत हा पराक्रम गाजवला हाेता.

 

बातम्या आणखी आहेत...