आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञान संस्थांसाठी नवे प्रवेश सूत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीकर (राजस्थान) - सीबीएसई बोर्डाने आयआयटी वगळता देशभरातील तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेशाचे सूत्र जारी केले आहे. माध्यमिक शिक्षणासह इतर राज्य बोर्डांचे गुण आणि सीबीएसई बोर्डाचे गुण यांना एकाच तराजूत कसे तोलले जाईल याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. सीबीएसईने आपल्या वेबसाइटवर त्याचे सूत्र जारी केले आहे. एनआयटी आणि ट्रिपल आयटीसारख्या तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेशासाठी 60:40 चे सूत्र अमलात आणले जाईल. त्यात 60 टक्के जेईई मुख्य परीक्षेचे आणि 40 टक्के बोर्डाच्या परीक्षेतील टक्केवारीवर आधारित ठरवले जातील. जेईई मेन्ससाठी 7 जुलै रोजी जारी होणार्‍या अंतिम निकालाचा विचार करून हे सूत्र तयार केले आहे. सीबीएसईचे अध्यक्ष विनीत जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्याच्या कामगिरीचे मूल्यमापन दोन प्रकारे होईल. बोर्डाचे गुण समाविष्ट करण्याची माहिती याआधीच विद्यार्थ्यांना देण्यात आली असून आता या प्रारूपाचीही माहिती दिली आहे.

बोर्डाच्या गुणांची सरासरी
जेईई मेन्स पेपर-एक आणि बोर्डाच्या 50-50 टक्के गुणांची सरासरी काढण्यासाठी एक गुंतागुंतीची प्रक्रिया अवलंबण्यात आली आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्याचे फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्सपैकी एक आणि एका भाषेसह विषयवार पर्सेंटाइल काढले जाईल. त्यानंतर जेईई पेपर-1 च्या गुणांची व बोर्डाच्या गुणांची बेरीज करून दोन वेगवेगळ्या सूत्रांनी ऑल इंडिया मेरिट लिस्ट तयार केली जाईल.

हॉलतिकीट ऑनलाइन
जेईई-अँडव्हान्सच्या वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीनुसार ज्या परीक्षार्थ्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर शुल्क जमा केले आहे. ते विद्यार्थी आपले रजिस्ट्रेशन व शुल्काची स्थिती जेईई-अँडव्हान्सच्या वेबसाइटवर जाऊन तपासू शकतात. 2 जून रोजी होणार्‍या जेईई-अँडव्हान्स परीक्षेसाठी 16 मेच्या सायंकाळपासून हॉलतिकीट ऑनलाइन डाउनलोड करू शकतील. आयआयटीद्वारे हॉलतिकीट पोस्टाने पाठवले जाणार नाही.

इतर बोर्डांतही लागू होईल
विद्यार्थी सीबीएसई बोर्डाचा असेल तर जेईईला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी सीबीएसईच्या टॉपरची निवड होईल. समजा सीबीएसईच्या टॉपरचे जेईई मुख्य परीक्षेत 340 गुण असतील तर ही व्हॅल्यू सूत्रात बी-2 अशी दाखवली जाईल. तसेच बी-1 ही व्हॅल्यू जेईई मुख्यच्या बोर्ड परीक्षेत आणि मुख्य परीक्षेत गुण मिळवणारा टॉपर दर्शवेल. उदाहरणार्थ ओव्हर ऑल टॉपरला 360 गुण आहेत. या दोन्ही व्हॅल्यू बी फायनल ठरवणार्‍या सूत्रात ठेवल्या जातील. हीच बाब इतर बोर्डांनाही लागू असेल.