आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतयात्रा सुरू असतानाच तो उठून बसला, वास्तवात घडली फिल्मी घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटक- एखाद्या चित्रपटाला शोभेल असा प्रसंग धारवडमध्ये घडला. मनागुंडी गावात एका युवकाची अंतयात्रा सुरु असताना तो उठून बसल्याची घटना घडली. कुमार मारेवाड (वय 17) असे या युवकाचे नाव आहे.
 
धारवडमधील या घटनेमुळे अंतयात्रेसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांचा मात्र चांगलाच गोंधळ उडाला. या घटनेमुळे सर्व गावकरी आश्चर्यचकित आहेत. दरम्यान कुमारला उपचारासाठी लगेच रुग्नालयात दाखल करण्यात आले. त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याची महिती डॉ. महेश निलकंटन्नवर यांनी दिली.
 
कुमारचे आई-वडील निंगप्पा आणि मंजूळा हे बांधकाम कामगार आहेत. त्यांनी सांगितले की, कुमारने दहावीनंतर शाळा सोडली आणि आम्हाला  मदत करण्यासाठी बांधकामाचे काम करु लागला. कुमारचा भाऊदेखिल आजारी असून आम्हाला मदतीची गरज आहे.

काय आहे प्रकरण...
- कुमारला काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्याला उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले होते.
- परंतु, कुमारची प्रकृती सुधारत नाही हे पाहून कुटुंबीयांनी कुमारला घरी आणले.
- काही दिवस गेल्यानंतर कुमारच्या शरिराने काम करणे बंद केले.
- कुमारचा मृत्यू झाला असावा असा त्याच्या कुटुंबीयांचा समज झाला.
- त्यानंतर कुमारवर धार्मिक सोपस्कार करण्यात आले.
- अंतयात्रेला सुरुवात झाली. त्याला अनेक नागरिक उपस्थित होते.
- अंतयात्रा स्मशानभूमीपर्यंत पोहोचली आणि कुमारने डोळे उघडले.
- कुमार हाता-पायांची हालचाल सुरू केली. हे बघून उपस्थितांना धक्काच बसला.
- त्यानंतर लगेच कुमारला उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले. 
- कुमारला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे डॉक्टर म्हणाले आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...