आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tej Pratap And Tejaswi Will Fight In Bihar Election From Mahua And Raghopur

बिहार निवडणूक : JDU-101, RJD-101, CONG-41 जागा लढवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महाआघाडीची जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि जनता दल संयुक्त (जेडीयू) प्रत्येकी 101 जागा लढवणार आहे तर काँग्रेसला 41 जागा सोडण्यात आल्या आहेत. महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा जेडीयूचे बिहार राज्य प्रमुख वशिष्ठ नारायणसिंह यांनी पत्रकार परिषदेत केली. उमेदवारांची यादी अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही. दरम्यान, सहा पक्षांच्या समाजवादी सेक्युलर फ्रंटनेही संपूर्ण 243 जागा लढवण्याची घोषणा केली. या आघाडीमध्ये समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, जन अधिकार मोर्चा, समाजवादी डेमोक्रॅटिक पार्टी आमि समता समरस समाज पार्टी यांचा समावेश आहे.
जेडीयूने त्यांच्या 12 जागा काँग्रेसला दिल्या
पहिल्या टप्प्यातील 49 जागांमध्ये जेडीयू 24, आरजेडी 17 आणि काँग्रेस 8 जागांवर निवडणूक लढणार आहे. महाआघाडीत झालेल्या चर्चेनूसार जेडीयूने 2010 मध्ये जिंकलेल्या 12 जागा काँग्रेसला सोडल्या आहेत. जेडीयूकडे असलेले मतदारसंघ बहुतेक शहरी भागातील आहेत.

लालूंच्या दोन्ही मुलांचे तिकीट निश्चित
लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही मुलांचे मतदारसंघ निश्चित झाले आहेत. तेजप्रताप महुआ येथून तर तेजस्वी यादव राघोपूरमधून निवडणूक लढणार आहे. राघोपूरवर जेडीयूचे सतीशकुमार यांचा दावा होता.
सतीशकुमार यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा जेडीयूसाठी मोठा धक्का मानला जात आहे.