आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tejashwi Explains How Lalu Struggle In His Early Life

लोकांची भांडी घासत होती लालू यादवांची आई, सर्व्हंट कॉर्टरमध्ये गेले सुरुवातीचे दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राघोपूर मतदारसंघात प्रचारसभेला संबोधित करताना तेजस्वी - Divya Marathi
राघोपूर मतदारसंघात प्रचारसभेला संबोधित करताना तेजस्वी
राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी राघोपूर विधानसभा मतदार संघातून निशीब आजमावत आहे. आई-वडील बिहारचे माजी मुख्यमंत्री असलेल्या या उमेदवारने एका मुलाखतीत सांगितले, आम्हा भावंडांचे बालपण सर्व्हंट कॉर्टरमध्ये गेले होते. गरीबी काय असते हे आम्हाला चांगले माहित आहे, कारण आम्ही ती जवळून अनुभवली आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात तेजस्वी यादव म्हणाले, आम्हाला माहित आहे आमच्या वडिलांनी किती मोठा संघर्ष केला आणि त्यानंतर आजचे दिवस आले आहेत. हे बिहारमधील गरीब जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत.
आजी, लोकांच्या घरी भांडी घासत होती
तेजस्वीने सांगितले, आमचे वडील एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्मले होते. ते पाच वर्षांचे असताना आमच्या आजोबांचे निधन झाले. घराची संपूर्ण जबाबादारी एकट्या आजीवर आली. तिने लोकांच्या घरी भांडी घासून संसार चालवला. परिस्थिती नव्हती तरीही शिक्षणासाठी ते (लालू यादव) पाटण्याला आले. शिक्षण पूर्ण केले. याच गरीब जनतेचे प्रेम आणि आशीर्वादाच्या बळावर आज आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत. त्या दिवसांची आजही आम्हाला जाणिव आहे.

आमचे बालपण सर्व्हंट कॉर्टरमध्ये गेले
तेजस्वी यादव यांनी सांगितले, माझ्या बहिण-भावांचे बालपण सर्व्हंट कॉर्टरमध्ये गेले. माझे काका पशुपालन विभागात शिपायी होते, त्यांच्या कॉर्टरमध्ये आम्ही राहात होतो. माझा जन्मही तिथेच झाला होता. याबद्दल आमची वडीलधारी मंडळी आम्हाला नेहमी सांगत असते. आमचे अर्धे आयुष्य तिथेच गेले आहे. गरीबी काय असते ते आम्ही जवळून अनुभवले आहे. त्यामुळे गरीबीतून जनतेची कशी मुक्ती होईल यासाठी आम्ही काम करणार आहोत. त्यासाठी बिहारच्या सर्व जनतेने एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षा तेजस्वींनी व्यक्त केली.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, तेजस्वी यादवांचा कसा सुरु आहे प्रचार...