आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक तरुण तेजपाल यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - सहकारी महिला पत्रकाराच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक करण्यात आलेले 'तहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल यांना सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान क्राइम ब्रँचच्या अधिकारी सुनीता सावंत यांनी तेजपाल यांना अटक केली. त्यानंतर आज (रविवार) त्यांना सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. शमा जोशी यांच्या पीठाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गोवा पोलिसांनी न्यायालयाकडे तेजपाल यांना 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अटक टाळण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणारे तेजपाल यांना आता सहा दिवस कोठडीत राहावे लागणार आहे.