आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telangana News In Marathi, Andhra Pradesh Assembly Rejects Bill

तेलंगणाला आंध्राचा "खो", आंध्र प्रदेश विधानसभेने तेलंगणा विधेयक फेटाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- तेलंगणा प्रांताला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी करणारे विधेयक आंध्र प्रदेश विधानसभेने फेटाळून लावल्याने तेलंगणासाठी प्रयत्नशील असलेल्या कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
आवाजी मतदानाने आंध्र प्रदेश विधानसभेने तेलंगणा प्रांताला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याचे विधेयक फेटाळून लावले आहे. बऱ्याच कालावधीपासून हे विधेयक विधानसभेत प्रलंबित होते. आज या विधेयकावर मतदान करण्याची आणि ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविण्याची अंतिम तारीख होती.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी तेलंगणा विरोधी विधेयक विधानसभेत सादर केले. त्यानंतर सभापतींनी यावर मतदान घेण्याचे जाहीर केले. आंध्र प्रदेश विधानसभेतील सदस्यांनी आवाजी मतदान करून हे विधेयक फेटाळून लावले.
आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा प्रांताला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. परंतु, आता आंध्र प्रदेश विधानसभेत विधेयक फेटाळून लावण्यात आल्याने कॉंग्रेसच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे.
तेलंगणा विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले तर राजकारणातून निवृत्ती घेण्याचा इशारा किरणकुमार रेड्डी यांनी दिला होता. आंध्र प्रदेशच्या विभाजनाला रेड्डी यांना प्रखर विरोध आहे.
गेल्या वर्षी 12 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींनी तेलंगणा विधेयक आंध्र प्रदेश विधानसभेत पाठविले होते. घटनेच्या कलम 3 अंतर्गत राष्ट्रपतींनी हे विधेयक राज्याला पाठविले होते.