आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Telengana Bill Not Introduce In Parliament Rain Session Sushilkumar Shinde

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात तेलंगणा विधेयक मांडले जाणार नाही - सुशीलकुमार शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - वोळ्या तेलंगणाच्या प्रस्तावाला यूपीएने हिरवा कंदील दिल्यानंतर आंध्र प्रदेशात विभाजनाविरुद्ध वातावरण तापत आहे. विधानसभेतील 26 आमदारांनी राजीनाम्याची तयारी केली असून 15 मंत्र्यांनीही पद सोडण्याचे ठरवले आहे. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी दिले.


आंध्रातील 6 मंत्र्यांनी विरोध म्हणून यापूर्वीच राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले आहेत. आगामी निवडणुकीत मतांच्या गणितांमुळे राजकीय अस्वस्थता वाढत चालली आहे. रायलसीमा व किनारपट्टीच्या जिल्ह्यांत निदर्शने, बंद आंदोलने सुरू आहेत.