आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telengana Bill Return To President, Andhra Chief Minister Disagree On Bill

स्वतंत्र तेलंगणा विधेयक राष्‍ट्रपतींकडे परत पाठवणार, मसुद्द्यावर आंध्रच्या मुख्‍यमंत्र्यांचे प्रश्‍नचिन्ह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - स्वतंत्र तेलंगणा निर्मीतीसाठीचे आंध्र प्रदेश पुनर्गठन विधेयक राष्ट्रपतींकडे परत पाठवण्याचा निर्णय मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी घेतला असून विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आंध्र प्रदेश विभाजनाचे हे विधेयक व्यापक स्वरुपाचे नसून त्यात अनेक त्रुटी व चुका असल्याचा आरोप रेड्डी यांनी विधानसभेत केला होता.याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष सोमवारी निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.
तेलंगणा निर्मीतीसाठी केंद्र सरकारने हे विधेयक विधीमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवले आहे.विधीमंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतरच केंद्र सरकारला तेलंगणा राज्याची औपचारिक घोषणा व पूर्तता करता येईल.परंतु रेड्डी यांच्या निर्णयामुळे काँग्रेस अडचणीत येऊ शकते. रेड्डी यांनी कलम 77 नुसार विधानसभा अध्यक्ष नंदेला मनोहर यांना नोटीस बजावली असून विधेयक केंद्राकडे परत पाठवण्यासाठी प्रस्ताव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. हे खरेखुरे विधेयक आहे अथवा मुसदा आहे हेच स्पष्ट होत नाही असा आक्षेप रेड्डी यांनी घेतला आहे.
विधेयकातील त्रुटी
आंध्र पुनर्गठन विधेयकातील त्रुटींवर बोट ठेवताना रेड्डी यांनी काही उदाहरणेही दिली. घटनेत समाविष्ट नसलेल्या अनेक तरतुदी यामध्ये समाविष्ट के ल्याचे त्यांनी सांगितले. दोन राज्यांसाठी एकच राजधानी, राष्ट्रपती राजवट आदी गोष्टींचा त्यात समावेश करण्यात आला आहे. यासह भरपूर त्रुटी असलेले विधेयक आपण कसे मान्य करणार, असा सवाल त्यांनी केला.
विभाजनास विरोध
मुख्यमंत्री रेड्डी यांचा आंध्रच्या विभाजनास तीव्र विरोध आहे. यापूर्वी ज्या-ज्या वेळी काँग्रेसने तेलंगणाचा विषय छेडला त्या वेळी रेड्डी यांनी मौन बाळगणेच पसंत केले होते. राज्याचे विभाजन झाल्यास आपण मुख्यमंत्रिपदावर राहणार नाही, असे त्यांनी शनिवारी सांगितले. हा काही एक दिवसाचा मामला नाही. विभाजनानंतर अनेक वर्षे दोन्ही राज्यांमध्ये वितुष्ट, भांडणे होत राहतील. त्यामुळे संयुक्त आंध्रच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड आपण करणार नाही, असे रेड्डी म्हणाले.