आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेलंगण स्थापनेला एक वर्ष पूर्ण; हैदराबादमुळे महसुलामध्ये भर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - अांध्र प्रदेशातून विभक्त होऊन स्थापन झालेल्या तेलंगणा राज्याला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. साधारण पाच दशकांच्या संघर्षानंतर या राज्याची निर्मिती झाली आहे. राज्य स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला विधानसभा निवडणुकीत लोकांनी सत्ता दिली.

२ जून २०१४ रोजी तेलंगणाची २९ वे राज्य म्हणून स्थापना झाल्यानंतर आंध्र प्रदेश आणि सीमांध्र भागात हिंसक निदर्शने करण्यात आली होती. विभाजनामध्ये हैदराबाद तेलंगणाकडे गेल्यामुळे तेलंगणाच्या महसुलात भर पडली आहे. राज्य स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारने अनेक कल्याणकारी व विकास योजनांची घोषणा केली.

विरोधी पक्षाने शेतीतील निराशाजनक स्थिती आणि पक्षांतराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत सरकारवर हल्ला चढवला आहे. राव यांनी वर्षपूर्तीनिमित्त पाणीपुरवठा, रस्ते, हरित तेलंगणा, महिला सुरक्षा आणि औद्योगिक धोरणांची घोषणा केली.

वीज प्रकल्पांसाठी ९१ हजार कोटी गंुतवणूक : तेलंगण पाणीपुरवठा प्रकल्पातून साधारण तीन कोटी लोकसंख्येला पाणी देण्याची योजना आखण्यात आली आहे. मिशन काकातिया मोहिमेतून सरकारने एकूण ४६,५३१ लघुसिंचन प्रकल्प हाती घेतले आहेत. गेल्या काही महिन्यांत राज्यात वीज टंचाई जाणवत होती. मात्र, सरकारने आता पुरेशी वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. अन्य राज्यांना वीज पुरवण्यासाठी तेलंगणाने ९१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे, असे मुख्यमंत्री राव यांनी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सांगितले.
अर्थसंकल्पामध्ये कल्याणकारी योजनांसाठी २७ हजार कोटी रुपये निधी राखून ठेवण्यात आला आहे. मुली, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी हैदराबादमये "शी टीम' स्थापन केली आहे.