आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telugu Desam Party Prunes BJP's Wishlist For Seats In Assembly And Lok Sabha Elections

भाजप-तेलगू देसम यांच्यात जागा वाटपावरून मतभेद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - भाजप व तेलगू देसम पार्टी यांच्यात जागा वाटपावरून अजूनही एकमत झाले नाही. त्यामुळे वैतागलेल्या भाजपने आपल्या उमेदवारांच्या निवड प्रक्रियेला वेग आणला आहे.

दोन्ही पक्षांतील मतभेद मिटलेले नाहीत. म्हणूनच भाजपने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी दिली. निवड समितीच्या बैठकीनंतर संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. तेलगू देसमसोबत आघाडीची चर्चा फिसकटल्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला मात्र जावडेकर यांनी बगल दिली. दोन्ही पक्षांत जागा वाटपावरून मतभेद निर्माण झालेले आहेत. ते मिटलेले नाहीत. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी लोकसभा आणि सीमांध्र व तेलंगणा विधानसभा निवडणूक एकत्र येऊन लढण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांत चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या; परंतु एकमत होऊ शकले नाही.

वाराणसीत अतिरिक्त सुरक्षा दलाची मागणी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाराणसी पोलिसांनी राज्य सरकारकडे अतिरिक्त सुरक्षा दलाची मागणी केली आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारची गुप्तचर माहितीची देवाण-घेवाण करण्याची विनंती केली आहे. वाराणसीमध्ये आयबीचे कार्यालय सुरुवातीपासून आहे. नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, मुख्तार अन्सारी यांची उमेदवारी, अनेक हिंदू धार्मिक स्थळे, पर्यटकांची मोठी गर्दी इत्यादी कारणामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवावी. अतिरिक्त पाच तुकड्या तैनात कराव्यात, अशी विनंती वाराणसी पोलिसांनी राज्य सरकारकडे केली आहे.