आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्फाळ काश्मीर पर्यटकांनी फुलले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहलगाम- देशातील उत्तरेसह अनेक भागांत उष्णतेच्या लाटेमुळे हैराण झालेल्या पर्यटकांनी काश्मीरची वाट धरल्याचे शनिवारी दिसून आले. येथील बेताब खोर्‍यात बर्फावर खेळण्याचा आनंद घेण्यासाठी लहान-मोठ्यांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. फोटोतील चिमुकले आई- वडिलांची घसरगुंडी पाहून तो थरार असा अनुभवत होते.

तापमानात घट
शनिवारी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांत झालेल्या तुरळक पावसाने नागरिकांची उकाड्यापासून सुटका केली. त्यामुळे तापमानदेखील घटले आहे. 43 वरून 40 वर पारा घसरला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि राजस्थानमध्येही तापमान कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.