आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

84 कोसी परिक्रमाः अयोध्‍येत तणाव, फोटोंमधून पाहा परिस्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्‍या- विश्‍व हिंदू परिषदेच्‍या बड्या नेत्‍यांना अटक केल्‍यानंतर अयोध्‍या आणि जवळपासच्‍या परिसरात तणावाचे वातावरण आहे. विहिंपचे अध्‍यक्ष अशोक सिंघल आणि नेते प्रवीण तोगडिया यांना रविवारी सकाळीच अटक करण्यात आली. त्‍यानंतर अनेक कार्यकर्त्‍यांनाही ताब्‍यात घेण्‍यात आले. तरीही 84 कोसी परिक्रमा यात्रा सुरु झाल्‍याचा दावा करण्‍यात आला आहे. कार्यकर्त्‍यांनी ऐनवेळी रणनीती बदलली. वेगवेगळ्या गटांनी विविध ठिकाणी शरयू नदीमध्‍ये स्‍नान केले. त्‍यानंतर पूजा करुन यात्रा सुरु केली. ओडीशातील पुरी येथून आलेल्‍या प्रशांत दास महाराज यांनी सरकारवर टीका केली. ते म्‍हणाले, हिंदुंना दाबण्‍याचा प्रयत्‍न करणारे सरकार आम्‍हाला परिक्रमा आणि राम मंदिर बनविण्‍यापासून रोखू शकणार नाही.

84 कोसी परिक्रमेच्‍या पार्श्‍वभूमीवर अयोध्‍या आणि परिसरातील परिस्थिती पाहा पुढील छायाचित्रांमधून...