आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू युवकाच्या हत्येनंतर गावात तणाव, मुस्लिम लपले मशिदीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शोक अनावर झालेले सतवीरचे कुटुंबीय - Divya Marathi
शोक अनावर झालेले सतवीरचे कुटुंबीय
मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील भूमा गावातील एका हिंदू युवकाच्या हत्येनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवकाच्या हत्येने संतप्त झालेल्या गावकऱ्यांच्या रोषापासून वाचण्यासाठी भूमा गावच्या मुस्लिम कुटुंबांनी मशिदीत आश्रय घेतला. मंगळवारी घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी लाठीचार्ज आणि हवेत फायरिंग करुन गावकऱ्यांना पिटाळले. त्यानंतर मुस्लिम कुटुंबांना मशिदीबाहेर काढले.
काय आहे प्रकरण
सोमवारी रात्री 25 वर्षीय सतवीर याला चार बाइकस्वारांनी गोळ्या झाडून ठार केले. घटनेवेळी तिथे तीन पोलिस उपस्थित असल्याची चर्चा होती. त्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप करत हिंदू समुदायातील लोक हत्या झालेल्या युवकाच्या घरासमोर एकत्र आले आणि घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जमावाने दगडफेक आणि गोळीबारही केला. त्याशिवाय परिसरातील गाड्यांची मोडतोड केली, काही ठिकाणी आग लावण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मुस्लिम कुटुंबांनी मशिदीत लपून राहाण्याचा निर्णय घेतला.
दोन आरोपींना अटक
पोलिसांनी या प्रकरणी याकूब आणि मोनू या दोघांना अटक केली आहे. आणखी दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. क्राइम ब्रँचचे राकेश जॉली यांनी घटनेनंतर निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
युवकाच्या कुटुंबीयांचा आरोप - पोलिसांसमक्ष मारल्या गोळ्या
बाइक स्वारांनी मारलेल्या सतवीरच्या कुटुंबीयांचा आरोप आहे, की सतवीरवर गोळीबार झाला तेव्हा तिथे तीन पोलिस उपस्थित होते. त्यातील एक निरीक्षक होता. असे असतानाही आरोपी फरार झाले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला नाही.

घटनेनंतर मीरपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. पीडित कुटुंबीयांनी पोलिस निरीक्षकावर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री निधीतून पीडीत कुटुंबाला पाच लाख रुपये मदत आणि एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर, कुटुंबीयांनी 25 लाख रुपयांची मागणी केली आहे.