आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर : अखनूरमध्ये GREF कँपवर दहशतवादी हल्ला, तीन मजूर ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सच्या कँपवर सोमवारी सकाळी दहशतवादी हल्ला झाला. एएनआयच्या वृत्तानुसार हल्ल्यात तीन मजूर मारले गेले आहे. हा कँप नियंत्रण रेषेपासून (LoC) अतिशय जवळ आहे. हल्ल्यानंतर लष्कराने संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. हा इंजिनिअरिंग कँप असल्याने येथे मोठ्या प्रमाणात सशस्त्र दल तैनात नसते. याचाच फायदा दहशतवाद्यांनी उचलला. 
 
हल्ल्यानंतर दहशतवादी फरार 
- अशी माहिती आहे की अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी हल्ला केला. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार 3 ते 4 दहशतवादी होते. 
- रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्स सीमेवर रस्ते बांधकामाचे काम पाहाते. 
 
 (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...