आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमधील कुपवाड्यात पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात 2 भारतीय जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- काश्मीरमधील अनंतबागजवळ अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन दिवस होत नाहीत, तोच  कुपवाड्यात बुधवारी एलओसीवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारताचे रणजित सिंग सतीश भगत हे दोन जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानने भारतीय चौक्यांवरही गोळीबार केला. केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानी जवान आणि भारतीय जवानांमध्ये जोरदार चकमक झाली.

दरम्यान, सोमवारी (10 जुलै) अमरनाथ यत्रेकरूंच्या एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 7  भाविकांचा मृत्यू झाला होता. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये हाय अॅलर्ट जारी करण्यात आला होता. लष्कर-ए-तोयबाने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारल्यानंतर या भागात भारतीय लष्कराची मोठ्या प्रमाणावर शोध मोहिम सुरू आहे.
 
बातम्या आणखी आहेत...